मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'अंतिम जन'चा सावरकरांवर विशेषांक; सावरकरांची गांधीजींशी तुलना वादात

'अंतिम जन'चा सावरकरांवर विशेषांक; सावरकरांची गांधीजींशी तुलना वादात

Jul 17, 2022, 10:06 AM IST

    • सावरकरांवरील या विशेषांकात महात्मा गांधी यांचा धार्मिक सहिष्णुतेवरील लेख, सावरकर यांचा हिंदुत्वावरचा लेख आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा सावरकर यांच्यावरचा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.
'अंतिम जन'चा सावरकरांवर विशेषांक (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

सावरकरांवरील या विशेषांकात महात्मा गांधी यांचा धार्मिक सहिष्णुतेवरील लेख, सावरकर यांचा हिंदुत्वावरचा लेख आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा सावरकर यांच्यावरचा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.

    • सावरकरांवरील या विशेषांकात महात्मा गांधी यांचा धार्मिक सहिष्णुतेवरील लेख, सावरकर यांचा हिंदुत्वावरचा लेख आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा सावरकर यांच्यावरचा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.

भारताच्या सांस्कृतिक मंत्रायलयाकडून प्रकाशित होणारे मासिक 'अंतिम जन' यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समर्पित करण्यात आले आहे. अंतिम जन हे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या गांधी स्मृती आणि दर्शन समितीकडून प्रकाशित करण्यात येते. याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. गांधी मेमोरियलच्यावतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या मासिकाचा हा विशेषांक सावरकरांवर असून यामध्ये सावरकरांची तुलना ही महात्मा गांधींशी करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा आदर हा महात्मा गांधींपेक्षा कमी नाही असं यामध्ये म्हटलं आहे. मासिक 'अंतिम जन'च्या कव्हर पेजवर विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो छापण्यात आला आहे. या विशेषांकात महात्मा गांधी यांचा धार्मिक सहिष्णुतेवरील लेख, सावरकर यांचा हिंदुत्वावरचा लेख आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा सावरकर यांच्यावरचा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.

सावरकरांची २८ मे रोजी जयंती होती. त्यानिमित्त हा विशेषांक समर्पित करण्यात आला होता. गांधी स्मृती आणि दर्शन समितीचे उपाध्यक्ष विजय गोयल यांनी म्हटलं की, "सावरकर हे महान व्यक्ती होते. जसे गांधी होते, पटेल होते. आम्ही त्यांच्या बलिदानातून शिकायला हवं. ब्रिटिशांच्या काळात सावरकर यांनी जितका काळ तुरुंगात घालवला तितकं कोणीही तुरुंगात नव्हतं."

अंतिम जन हा अंक प्रसिद्ध झाल्यानंतर गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी हे हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की," गांधीवादी संस्था सांभाळणाऱ्या या प्रशासनासोबत हे पुन्हा पुन्हा होत राहील. सावरकरांची तुलना गांधींसोबत करणं हे त्यांची हतबलता दाखवणारं आहे. गांधीवादी विचारसरणीला भ्रष्ट करण्यासाठी आणखी एक नवं नरेटिव्ह असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटलं की, "गांधी स्मृती संस्था इतर संस्थांप्रमाणेच नष्ट करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. सावरकरांना एक महान व्यक्ती म्हणून प्रदर्शित केलं जात आहे. हा आरएसएसचा अजेंडा आहे. सध्याच्या सरकारचं समाधान करण्यासाछी देशाच्या इतिहासाची केली जाणारी मोडतोड ही दुर्दैवी आहे."

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या