मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Polygraph Test: पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवणाऱ्या डॉ. प्रदीप कुरुलकरांची ‘पॉलिग्राफ टेस्ट’ होणार

Polygraph Test: पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवणाऱ्या डॉ. प्रदीप कुरुलकरांची ‘पॉलिग्राफ टेस्ट’ होणार

May 17, 2023, 03:41 PM IST

  • पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय संरक्षण क्षेत्राची गोपनीय माहिती पुरविणाऱ्या पुण्यातील डॉ. प्रदीप कुरुलकर कडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिस त्यांची पॉलिग्राफ टेस्ट करणार आहे. Polygraph test of DRDO scientist Pradeep Kurulkar

Dr Pradeep Kurulkar, Director of the Research & Development Establishment (Engineers), Defence Research and Development Organisation (DRDO), has been arrested on charges of allegedly providing crucial information to a Pakistani intelligence operative. (IDU Twitter)

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय संरक्षण क्षेत्राची गोपनीय माहिती पुरविणाऱ्या पुण्यातील डॉ. प्रदीप कुरुलकर कडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिस त्यांची पॉलिग्राफ टेस्ट करणार आहे. Polygraph test of DRDO scientist Pradeep Kurulkar

  • पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय संरक्षण क्षेत्राची गोपनीय माहिती पुरविणाऱ्या पुण्यातील डॉ. प्रदीप कुरुलकर कडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिस त्यांची पॉलिग्राफ टेस्ट करणार आहे. Polygraph test of DRDO scientist Pradeep Kurulkar

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय संरक्षण क्षेत्राची गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने (Anti Terrorism Squad) डॉ. प्रदीप कुरुलकर यांना ४ मे रोजी पुण्यातून अटक केली होती. पुणे शहरातील DRDO अर्थात Defence Research and Development Organisation या संस्थेचे संचालक असलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांची हेरगिरी प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅप अर्थात तरुणींच्या मोहजालात अडकवण्यासाठी ज्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क करण्यात आला तो मोबाइल भारतीय वायुदलातील शिपाई निखिल शेंडे याचा असल्याचे दहशतवादी विरोधी पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. परंतु कुरुलकरांकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. पॉलिग्राफ टेस्टसाठी कुरुलकरांच्या कुटुंबीयांकडून संमती घेण्यात येईल, असं दहशतवादी विरोधी पथकाने न्यायालयाला सांगितले आहे. कुरुलकर यांचा मोबाइल व लॅपटॉप दहशतवादी विरोधी पथकाच्या ताब्यात असून तांत्रिक तपास करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

 

‘पॉलिग्राफ टेस्ट’ कशी केली जाते?

तपास यंत्रणा मोठ्या गुन्ह्याचा तपास करत असताना अनेकदा गुन्हेगार खोटं बोलण्याची शक्यता असते. यात तपास यंत्रणांची दिशाभूल होण्याचा धोका असतो. कोणतीही व्यक्ती काही गोष्टी लपवून, खोटं सांगत असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात स्वतःहून सुप्त बदल होत असतात. यात प्रामुख्याने हृदयाची धडधड वाढणे, श्वसनाचा पॅटर्न बदलणे, रक्तदाब वरखाली होणे, हातापायाला घाम सुटणे या गोष्टी घडतात. या मानकांच्या आधारे तज्ज्ञांनी एक चाचणी विकसित केली आहे. त्याला पॉलिग्राफ टेस्ट असे म्हणतात. एखाद्या व्यक्ती सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरं कसे देतो, तसेच त्याला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांना प्रतिसाद कसा देतो, यातलं अंतर या चाचणीद्वारे मोजता येतं. यावरून समोरची व्यक्ती खरं बोलतोय की खोटं, हे शरीरातील बदलांवरून कळतं.

तपास यंत्रणांना गुन्हेगाराची पॉलिग्राफ टेस्ट करायची असल्यास न्यायालय तसेच आरोपीच्या कुटुंबीयांकडून परवानगी घ्यावी लागते. परवानगी मिळाल्यावर गुन्हेगाराला कुठला आजार आहे किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी त्याची शारीरिक तपासणी केली जाते. मग त्याच्या शरीराला काही सेन्सर जोडले जातात, रक्तदाब मोजायला दंडावर पट्टा, पोटाला-छातीला प्रेशर सेन्सर असलेले पट्टे, आणि बोटाला रक्तप्रवाह मोजणारे सेन्सर जोडले जातात. या सगळ्या सेन्सर्समधून येणारे सिग्नल एका डिजिटल मॉनिटरवर नोंदवले जातात. या चाचणीदरम्यान आधी सोपे प्रश्न विचारले जातात. यामध्ये ‘तुझं नाव काय’, ‘वय किती आहे’, ‘जन्म कुठे झाला’, ‘शिक्षण किती झाले’, ‘आईवडिलांची माहिती’ असे साधे प्रश्न असतात. या प्रश्नाच्या वेळी त्याच्या शरीराचा सामान्य प्रतिसाद नोंदवला जातो. त्यानंतर पुढील निर्णायक प्रश्नांना सुरुवात होते. यातील काही प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही स्वरूपात असतात तर काही प्रश्नांची उत्तरं विस्तृत असतात. या उत्तरांवरच्या शारीरिक प्रतिसादावरून ती व्यक्ती खरं बोलतेय की खोटं, याचा अंदाज बांधला जातो.

पुढील बातम्या