मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Summer Vacation : वाढत्या उष्णतेमुळं राज्यातील शाळांना उद्यापासून उन्हाळी सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Summer Vacation : वाढत्या उष्णतेमुळं राज्यातील शाळांना उद्यापासून उन्हाळी सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Apr 20, 2023, 10:06 PM IST

    • Deepak Kesarkar : राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ होत असल्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारने उद्यापासून शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
summer vacation for schools in maharashtra (HT)

Deepak Kesarkar : राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ होत असल्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारने उद्यापासून शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

    • Deepak Kesarkar : राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ होत असल्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारने उद्यापासून शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Education Minister Deepak Kesarkar : उष्णतेची तीव्रता लक्षात घेता शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शाळांना उद्यापासून सुटी देण्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. सुटीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळी अथवा संध्याकाळी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असून नववी अथवा दहावीचे विद्यार्थी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळं तब्बल १२ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शाळांना सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Couple Suicide: मुंबईच्या कांदिवलीत नैराशातून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ होत असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या परिक्षा झाल्या असतील तर शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. त्यानंतर आता या आदेशाची लेखी प्रत शालेय विभागाला पाठवून शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचंही शिक्षणमंत्री केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ होत आहे. याशिवाय उष्णाघातामुळं अनेकांना त्रास होत असल्याच्या घटनांची शिंदे-फडणवीस सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्यातच आता वाढत्या तापामानामुळं राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्यामुळं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खारघर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.

Manmad Nashik : ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, नाशिकच्या मनमाडमधील धक्कादायक प्रकार

राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी तापमानाने चाळीसी पार केली आहे. त्यामुळं अशा स्थिती विद्यार्थ्यांनी शाळेत जाणं त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं, असं शिक्षणमंत्री केसरकर यांनी म्हटलं आहे. याबाबात केसरकर यांनी शाळांच्या परिक्षांबाबतचा अहवाल मागवला असून मे महिन्याची सुट्टी एप्रिलपासूनच जाहीर केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

पुढील बातम्या