मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anil Parab: अनिल परब यांच्या अडचणी वाढणार, न्यायालयाने बजावले समन्स

Anil Parab: अनिल परब यांच्या अडचणी वाढणार, न्यायालयाने बजावले समन्स

Nov 10, 2022, 09:18 AM IST

    • Anil Parab: अनिल परब यांना पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम १५ अन्वये समन्स बजावण्यात आले आहेत. तसंच सुनावणीसाठी १४ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.
अनिल परब (HT PHOTO)

Anil Parab: अनिल परब यांना पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम १५ अन्वये समन्स बजावण्यात आले आहेत. तसंच सुनावणीसाठी १४ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.

    • Anil Parab: अनिल परब यांना पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम १५ अन्वये समन्स बजावण्यात आले आहेत. तसंच सुनावणीसाठी १४ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.

Anil Parab: शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी आता न्यायालयाने अनिल परब यांच्यासह तिघांना सन्मन्स बजावण्याचे आदेश दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या साई रिसॉर्टच्या मुद्द्यावरून अनेक आरोप केले होते. दापोली रिसॉर्ट प्रकरणी पोलिसांनी अनिल परब यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

अनिल परब यांना पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम १५ अन्वये समन्स बजावण्यात आले आहेत. तसंच सुनावणीसाठी १४ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत. केंद्रीय पर्यावरण विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर दापोली न्यायालयात सुनावणी झाली.

सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून साई रिसॉर्टचे बांधकाम केल्याचा आरोप अनिल परब यांच्यावर आहे. याप्रकऱणी केंद्रीय पर्यावरण मंत्रायलाने अनिल परब यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. पर्यावरण विभागाकडून वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने समन्स बजावले.

दापोलीत असलेलं साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचे असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. रिसॉर्टच्या बांधकामात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना जानेवारीमध्ये न्यायालयाने दिले आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या