मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anil Parab : सोमय्यांच्या पत्राच्या आधारे म्हाडानं तोडलं अनिल परब यांचं कार्यालय; मुंबईत राडा

Anil Parab : सोमय्यांच्या पत्राच्या आधारे म्हाडानं तोडलं अनिल परब यांचं कार्यालय; मुंबईत राडा

Jan 31, 2023, 02:28 PM IST

  • Anil Parab Vs Kirit Somaiya : अनिल परब यांचे वांद्रे येथील अनधिकृत बांधकाम म्हाडाला सांगून तोडले असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी ट्विट करून केला आहे. यामुळे नवा वाद उफळण्याची शक्यता आहे.

अनिल परब यांच्या वांद्रे येथील अनधिकृत कार्यालय तोडले

Anil Parab Vs Kirit Somaiya : अनिल परब यांचे वांद्रे येथील अनधिकृत बांधकाम म्हाडाला सांगून तोडले असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी ट्विट करून केला आहे. यामुळे नवा वाद उफळण्याची शक्यता आहे.

  • Anil Parab Vs Kirit Somaiya : अनिल परब यांचे वांद्रे येथील अनधिकृत बांधकाम म्हाडाला सांगून तोडले असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी ट्विट करून केला आहे. यामुळे नवा वाद उफळण्याची शक्यता आहे.

मुंबई : भाजपनेते आणि शिवसेनेचे अनिल परब यांच्यातील वाद आता वाढण्याची चिन्हे आहेत. किरीट सोमय्या यांनी म्हाडाला पत्र लिहून परब यांचे वांद्रे येथील कार्यालय तोडल्याचा दावा केला आहे. या कार्यालयाचा फोटो देखील त्यांनी ट्विट केला आहे. दरम्यान, या तोडलेल्या कार्यालयाची पाहणी किरीट सोमय्या करणार असून या वेळी गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे किरीट सोमय्या यांचा रडार वर आहेत. त्यांच्या कोकणातील अनधिकृत रिसॉर्टनंतर वांद्रे येथील म्हाडा कॉलोनित अनधिकृत कार्यालय असल्याचा दावा करत किरीट सोमय्या यांनी हे कार्यालय पाडण्यासंदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार म्हाडानेही हे बांधकाम पाडण्याची नोटीस परब यांना दिली होती. मात्र हे काम परब यांनी पाडले नसल्याने, अखेर म्हाडाने त्यांच्या वांद्रे येथील कार्यालयावर हातोडा मारला आहे. दरम्यान, हे बांधकाम नियमित करण्यासाठी परब यांनी दिलेला प्रस्ताव देखील म्हाडाने फेटाळून लावला आहे.

परब यांचे हे कार्यालय पडल्यावर किरीट सोमय्या या ठिकाणी भेट देणार आहेत. यावेळी शिवसेना कार्यकर्ते आणि भाजप करकर्ते यांच्यात वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

अनिल परबांविरोधात आमचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनीही म्हाडाकडे तक्रार केली होती. त्यांचे सरकार असल्यानं कारवाई झाली नव्हती. आता अनिल परब यांची आमदारकी रद्द व्हावी यासाठी तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली आहे.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या