मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anil Parab : अनिल परब यांना ईडीचा धक्का, साई रिसॉर्ट प्रकरणी १०.२० कोटींची संपत्ती जप्त

Anil Parab : अनिल परब यांना ईडीचा धक्का, साई रिसॉर्ट प्रकरणी १०.२० कोटींची संपत्ती जप्त

Jan 04, 2023, 06:52 PM IST

  • anil parab money laundering case : अनिल परब यांना ईडीने पुन्हा दणका दिला असून साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने परब यांची दापोलीतील १०.२० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

अनिल परब यांना ईडीचा धक्का

anil parab money laundering case : अनिल परब यांना ईडीने पुन्हा दणका दिला असून साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने परब यांची दापोलीतील १०.२० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

  • anil parab money laundering case : अनिल परब यांना ईडीने पुन्हा दणका दिला असून साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने परब यांची दापोलीतील १०.२० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

मुंबई -  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना ईडीने पुन्हा दणका दिला आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने परब यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार १०. २० कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने ट्विट करून या कारवाईची माहिती दिली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

या कारवाईवर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली असून, या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. तसेच ईडीने संपत्ती जप्तीची कारवाई केली असल्यास आपण त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.  

ईडीने केलेल्या ट्विटनुसार मनी लाँड्रिंग प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची १०.२० कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत दापोलीतील ४२ गुंठे जमीन आणि साई रिसॉर्ट या इमारतीचा समावेश आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या तक्रारीनंतर ईडीने ही कारवाई केली आहे.

ईडीकडून यापूर्वीही दापोलीतील साई रिसॉर्टशी संबधीत प्रकरणात अनिल परब यांची अनेक वेळा चौकशी झाली आहे. त्याचबरोबर साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने सात ठिकाणी छापेमारी देखील केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्टप्रकरणी आरोप केल्यानंतर ईडीने कारवाईचे सत्र सुरू केले होते. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या