मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thackeray Group : ठाकरेंची शिवसेना विधानसभेत आक्रमक, किरीट सोमय्यांविरोधात मांडला हक्कभंग प्रस्ताव

Thackeray Group : ठाकरेंची शिवसेना विधानसभेत आक्रमक, किरीट सोमय्यांविरोधात मांडला हक्कभंग प्रस्ताव

Mar 10, 2023, 08:14 PM IST

    • Thackeray Group : भाजपनं संजय राऊतांविरोधात हक्कभंग ठराव मांडला होता. त्यानंतर आता विधानसभेत किरीट सोमय्या यांच्याविरोधात हक्कभंग ठराव मांडण्यात आला आहे.
anil parab vs kirit somaiya (HT)

Thackeray Group : भाजपनं संजय राऊतांविरोधात हक्कभंग ठराव मांडला होता. त्यानंतर आता विधानसभेत किरीट सोमय्या यांच्याविरोधात हक्कभंग ठराव मांडण्यात आला आहे.

    • Thackeray Group : भाजपनं संजय राऊतांविरोधात हक्कभंग ठराव मांडला होता. त्यानंतर आता विधानसभेत किरीट सोमय्या यांच्याविरोधात हक्कभंग ठराव मांडण्यात आला आहे.

Thackeray Group On Kirit Somaiya In Vidhan Sabha : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना कोर्टानं मोठा दणका दिला आहे. हसन मुश्रीफ यांना अटकेपासून दिलासा देत प्रकरणातील कागदपत्र किरीट सोमय्या यांना कशी काय मिळाली?, असा सवाल करत न्यायालयानं या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळं आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली असतानाच आता ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी विधानसभेत सोमय्या यांच्याविरोधात हक्कभंग ठराव मांडला आहे. त्यामुळं आता यावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात हक्कभंग ठराव मांडला आहे. त्यानंतर बोलताना परब म्हणाले की, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अनधिकृत जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सदर जागा माझ्या नावावर नसल्याचं तपासातून समोर आलेलं आहे. सोमय्या यांच्या आरोपांमुळं माझी नाहक बदनामी झाली असून माझी प्रतिमा मलिन करण्याचं काम किरीट सोमय्या यांनी केलं आहे. त्यामुळं आता त्यांच्याविरोधात मी विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव सादर केला असून त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरं जावं लागणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

सोसायटीनं परवानगी दिल्यानंतर तिथं शेडमधील कार्यालयात मी काम करत होतो. तिथं मी लोकप्रतिनिधी म्हणून बसायचो. त्यामुळं मीच म्हाडाचा प्लॉट हडपला असा आरोप करत किरीट सोमय्या यांनी माझी नाहक बदनामी केल्याचंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. हक्कभंगाचा ठराव मांडल्यानंतर प्रकरण चौकशी आणि कारवाईसाठी विशेष हक्क समितीकडं पाठवण्यात यावं, अशी विनंती देखील अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्षांना केली. त्यामुळं आता किरीट सोमय्या यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

पुढील बातम्या