मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anil jaisinghani : अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

Anil jaisinghani : अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

Mar 20, 2023, 02:05 PM IST

  • Anil Jaisinghani arrest : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणीवस यांच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणी अनिल जयसिंघानी यांना अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबई पोलिसांनी गुजरातहून मुंबईत आणण्यात येत आहे.

अनिल जयसिंघानी - अमृता फडणीवस

Anil Jaisinghani arrest : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणीवस यांच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणी अनिल जयसिंघानी यांना अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबई पोलिसांनी गुजरातहून मुंबईत आणण्यात येत आहे.

  • Anil Jaisinghani arrest : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणीवस यांच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणी अनिल जयसिंघानी यांना अटक करण्यात आली आहे. त्याला मुंबई पोलिसांनी गुजरातहून मुंबईत आणण्यात येत आहे.

Anil Jaisinghani arrest in Amruta Fadnavis blackmailing case : अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक अटक केली आहे. अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्या प्रकरणी, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील लाच देणारी अनिक्षाला य यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अनिक्षा जयसिंघानी हिने हा लाच देण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी अनिक्षाच्या विरोधात तक्रार देण्यात आली होती. अनिक्षा ही डिझायनर असून तिने अमृता फडणवीस यांना पब्लिक इव्हेंटमध्ये तुम्ही मी डिझाइन केलेले ड्रेसेस आणि ज्वेलरी परिधान करा. त्यामुळे मला माझ्या ब्रांडचं प्रमोशन करता येईल. अमृता फडणवीस यांनी ही बाब मान्य केली.

मात्र अमृता फडणवीस यांनी हा आरोप केला आहे की काही कालावधीनंतर अनिक्षाने तिच्या वडिलांच्या साथीने मला धमकी दिली आणि माझ्याविरोधात षडयंत्र रचलं. या प्रकरणी फसवणूक आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचे विधान सभेत देखील पडसाद उमटले होते. पोलिसांनी अनिक्षा जयसिंघानीला अटक केल. ती बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी असून अनिलने या प्रकरणी तिला मदत केली होती. या प्रकरणी पोलिस अनिल जयसिंघानीया याचा शोध घेत होते. अनिल हा गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक गुजरातला जाऊन त्याला अटक केली आहे. अनिल सिंघानीया याला मुंबईत आणले जात आहे.

 

अनिल जयसिंघानीया हा उल्हासनगरमधील क्रिकेट बुकी आहे. त्याला २०१० साली छोटा बुकी म्हणून ओळखला जायचा. त्याला याच वर्षी बेटींग करतांना अटक करण्यात आली होती. ब्लू बॉय ऑफ मुंबई ओळख असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा तो जवळचा व्यक्ती होता. त्याची मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर सीपी ऑफिसमध्ये वर्दळ वाढली. एवढेच नाही तर १९९५ काँग्रेसकडून उल्हासनगर पालिका निवडणूक लढवली होती. त्यानंतर १९९७च्या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता. गेल्या १५ वर्षांपासून अनिल सिंघानीया हा फरार विविध गुन्हात फरार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या