मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tuljapur Temple : नवरात्री आधीच तुळजाभवानी मंदिरात सापडला पुरातन खजिना, शिवरायांचं नाव अन् जगदंबा लिहिलेला आढळला अंलकार

Tuljapur Temple : नवरात्री आधीच तुळजाभवानी मंदिरात सापडला पुरातन खजिना, शिवरायांचं नाव अन् जगदंबा लिहिलेला आढळला अंलकार

Oct 11, 2023, 08:41 PM IST

  • Tuljapur tulja bhavani Temple : तुळजाभवानी मंदिरात पुरातन काळातील मौल्यवान दागिन्यांचा खजिना सापडला आहे. यावर छत्रपती शिवरायांचे व जगदंबा नाव कोरलेले आहे. 

Tuljapur temple

Tuljapur tulja bhavani Temple : तुळजाभवानी मंदिरात पुरातन काळातील मौल्यवान दागिन्यांचा खजिना सापडला आहे. यावर छत्रपती शिवरायांचे व जगदंबा नाव कोरलेले आहे.

  • Tuljapur tulja bhavani Temple : तुळजाभवानी मंदिरात पुरातन काळातील मौल्यवान दागिन्यांचा खजिना सापडला आहे. यावर छत्रपती शिवरायांचे व जगदंबा नाव कोरलेले आहे. 

महाराष्ट्राची आराध्य देवी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात पुरातन दागिन्यांचा खजिना सापडला आहे. या पुरातन खजिन्यात रोमन साम्राज्य काळातील दागिन्यांचाही समावेश आहे. सापडलेल्या या अलंकारांवर छत्रपती शिवरायांचं नाव आहे. शिवकालीन दागिन्यांचा साठा सापडल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित मोठा पुरावा मिळाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात सापडलेल्या या अलंकारांमध्ये आठव्या शतकातील रोमन साम्राज्य काळातील मौल्यवान अलंकारांचा समावेश आहे. रोमन साम्राज्याच्या काळात बनवलेले चार हार आढळले आहेत.  यात मौल्यवान कॅरेटचा हिरा आढळला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेला पहिला अलंकार आहे. त्याचबरोबर शिवकालीन जगदंबा लिहिलेला अलंकारही सापडला आहे. हे दागिने जतन करण्याची मागणी केली जात आहे. 

तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक. दरवर्षी लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनाला येतात आणि देवीची खणा-नारळाने ओटी भरतात. दान स्वरूपात देवीच्या चरणी सोन्या-चांदीचे, हिरोजडीत दागिने अर्पण केले जातात. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी भरभरून दान अर्पण केले जाते. भाविकांकडून अर्पण सोने चांदीच्या दागिन्यांची मोजणी २३ जून २०२३ रोजी पूर्ण झाली. यामध्ये  २००९ पासून तुळजाभवानीच्या चरणी २०७ किलो म्हणजेच सोने आणि २५७० किलो चांदीचे दान करण्यात आले आहे. यामध्ये ३५४ मौल्यवान हिऱ्यांचाही समावेश आहे. देवीच्या चरणी अर्पण दानाची मोजदाद १५ दिवस चालली. या प्रक्रियेमध्ये २५ लोकांचा समावेश होता. तब्बल १५ वर्षानंतर भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या- चांदीची देवस्थान कडून मोजदाद करण्यात आली आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या