मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anandacha shidha : यंदाही सणवार होणार गोड.. गणपती-दिवाळीला आनंदाचा शिधा देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Anandacha shidha : यंदाही सणवार होणार गोड.. गणपती-दिवाळीला आनंदाचा शिधा देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Aug 18, 2023, 03:49 PM IST

  • Anandacha shidha : गेल्यावर्षी राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. यंदा देखील याच रेशनधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.

Anandacha shidha

Anandachashidha: गेल्यावर्षी राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. यंदा देखील याच रेशनधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.

  • Anandacha shidha : गेल्यावर्षी राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. यंदा देखील याच रेशनधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत गौरी गणपती आणि दिवाळी सणांसाठी आनंदाचा शिधादेण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही केवळ १०० रुपयांत अनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा बॅगमध्ये प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल आदी गोष्टींचा समावेश या शिध्यामध्ये असणार आहे. सर्वसामान्यांचे सण हे आनंदात जावे यासाठी राज्य सरकारने मागील वर्षी आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सरकारने एका संस्थेला ५१३ कोटी रुपयांचा ठेका दिला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Updates: मुंबई, ठाण्यात पुढील ४८ तासात पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

Rain News : प्रचारसभांत पावसाचे विघ्न! राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, पिकांचे मोठे नुकसान

Pune News : साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, पुण्यातील हडपसर येथील घटना

गेल्यावर्षी राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. यंदा देखील याच रेशनधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. मात्र गुडीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा जनतेपर्यंत वेळवर पोहचला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा तरी हा शिधा सामान्यांच्या घरी वेळेवर पोहचणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

  • राज्यातील  १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवणार आहे. पाच हजार कोटीचा प्रस्ताव  (आदिवासी विकास विभाग) 
  • गौरी गणपती, दिवाळीसाठी १००  रुपयात आनंदाचा शिधा प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा (अन्न व नागरी पुरवठा)
  • आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा 500 रुपये मिळणार  (कौशल्य विकास ) 
  •  मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी (महसूल विभाग)
  • महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द (गृह विभाग )
  • केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम, राज्याचा हिस्सा वाढला (महिला व बाल विकास) 
  • सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा 2023 चा अध्यादेश मागे (सहकार विभाग ) 
  • दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन
    (विधी व न्याय विभाग )
  • मंडणगड येथे दिवाणी न्यायालय (विधी व न्याय विभाग)

आनंदाचा शिधा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो असलेल्या पिशव्यांमधून देण्यात येतो. पण मागील वर्षी या शिध्यामधील बरचसं सामान हे गायब होतं. म्हणजे काही ठिकाणी या किटमधून साखर गायब होती, तर कुठे डाळच या किटमध्ये नव्हती.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या