मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIDEO : अमृता फडणवीसांनी राम मंदिरात केली साफसफाई, नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल, म्हणाले..

VIDEO : अमृता फडणवीसांनी राम मंदिरात केली साफसफाई, नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल, म्हणाले..

Jan 18, 2024, 08:47 PM IST

  • Amruta Fadnavis Video : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील झावबा राम मंदिरात साफसफाई केली. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटीझन्सकडून त्यांना ट्रोल केले जात आहे.

Amruta fadnavis 

Amruta Fadnavis Video : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील झावबा राम मंदिरात साफसफाई केली. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटीझन्सकडून त्यांना ट्रोल केले जात आहे.

  • Amruta Fadnavis Video : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील झावबा राम मंदिरात साफसफाई केली. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटीझन्सकडून त्यांना ट्रोल केले जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणानं नेहमी चर्चेत असतात. तसेच त्या सोशल मीडियावरही सक्रीय असतात. काही दिवसापूर्वी त्यांनी बर्फात ध्यान करत असतानाचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलच ट्रोल केलं होतं. आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात अमृता फडणवीस मुंबईतील सर्वात जुन्या झावबा राम मंदिराच्या पायऱ्या धुताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून अमृता फडणवीसांना पुन्हा ट्रोल केलं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

या व्हिडीओत अभिनेते जॅकी श्रॉफही दिसत आहेत. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, अमृता फडणवीसांच्या हातात झाडू व मॉब असून त्या पाणी टाकून मंदिरातील पायऱ्यांची साफसफाई करत आहेत.

मंदिरातील साफसफाईचा व्हिडिओ शेअर करताना अमृता यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना मंदिराच्या स्वच्छतेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरातील मंदिरांना स्वच्छ ठेवण्याच्या त्यांच्या आवाहनाला अनुसरून आज मुंबईतील सर्वात जुने राम मंदिर स्वच्छ केले. स्वच्छता हाच ईश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे, असे म्हटले जाते,  त्याचा इथे अनुभवही आला. आज मनःशांती व देवळातील पावित्र्य जवळून अनुभवता आलं. खरंच धन्य झालो.

अमृता यांच्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करताना काहींनी कौतुक केलं आहे तर अनेकांनी ट्रोलं केलं.'गड किल्लेपण साफ करा. वाईट अवस्था होत चालली आहे', 'हे सगळं नाटक आहे', 'स्वतः घरामध्ये एक ग्लास तरी उचलत असाल का', मंदिर पवित्र असतात व रोज साफ होत असतात केवळ नाटक चालू आहे, अशा अनेक कमेंट्स येत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या