मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amruta fadnavis on Ajit pawar : अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का? अमृता फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Amruta fadnavis on Ajit pawar : अजित पवार मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला आवडेल का? अमृता फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Apr 22, 2023, 09:18 PM IST

  • Amruta fadnavis : अजित पवार जर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर तुम्हाला आवडेल का? या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

Amruta fadnavis on Ajit pawar

Amrutafadnavis : अजित पवार जर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तरतुम्हाला आवडेल का? या प्रश्नावरअमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

  • Amruta fadnavis : अजित पवार जर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर तुम्हाला आवडेल का? या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

Amruta Fadnavis on ajit pawar : एका माध्यम समुहाला मुलाखत देताना अजित पवार म्हणाले की, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे.यावेळी अजित पवारभाजपमध्ये येतील का, यावरही त्यांनी मजेशीर उत्तर दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

अमृता फडणवीस आज एका कार्यक्रमानिमित्त पुणे दौऱ्यावर होत्या. यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार जर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर तुम्हाला आवडेल का? या प्रश्नावरअमृता फडणवीस म्हणाल्या, की मला वाटतं महाराष्ट्र असं राज्य आहेजे खूप काही करू शकते आणि सध्या ते करत आहे. यासाठी जो माणूस, जो पक्ष आपल्या जनतेसाठी पुढे येतो. त्या पक्षाला जनता न्याय देते. मग तो कोणीही असला तरी चालेल. त्याचबरोबर अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, राजकारणी लोकांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध असतात. त्यामुळे कोण कुठं कुठं डोळं मारतंय काहीच सांगता येत नाही. त्याचबरोबर अजित पवार भाजपमध्ये येतील की नाही याची माहिती अजित पवार व देवेंद्र फडणवीसांच असेल.

 

दरम्यान अजित पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, होय मला १०० टक्के मुख्यमंत्री व्हायला आवडेल. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार समर्थक आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. अजित पवारांनी आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्याने याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटण्यास सुरुवात झाली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, कोणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर त्यात गैर काही नाही. अनेकांना ते आवडतं, पण प्रत्येकजण मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुढील बातम्या