मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amruta fadnavis : “ते लोक खूप ठिकाणी डोळे मारतात, त्यामुळे…”, अमृता फडणवीसांचा अजित पवारांना टोला

Amruta fadnavis : “ते लोक खूप ठिकाणी डोळे मारतात, त्यामुळे…”, अमृता फडणवीसांचा अजित पवारांना टोला

Apr 22, 2023, 07:21 PM IST

  • Amruta fadnavis on ajit pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भाजप प्रवेशावरून टोला लगावला आहे.  

अमृता फडणवीसांचा अजित पवारांना टोला

Amruta fadnavis on ajit pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भाजप प्रवेशावरून टोला लगावला आहे.

  • Amruta fadnavis on ajit pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भाजप प्रवेशावरून टोला लगावला आहे.  

आपल्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला आहे. अजित पवारांसारखे लोक खूप ठिकाणी डोळे मारत असतात त्यामुळे ते भाजपसोबत येणार की, नाही ते त्यांना व देवेंद्र फडणवीसांनाच माहीत, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याची व ते आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपमध्ये सामील होण्याची चर्चा सुरू असताना अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.अजित पवार भाजपाबरोबर येणार की नाही ते अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोघांनाच माहिती असणार आहे. राजकारण्यांची खूप लोकांशी जवळीक असते. ते लोक खूप ठिकाणी डोळे मारतात. त्यामुळे मला माहिती नाही की, कोण-कोण कुठे कुठे डोळे मारत आहे, असा टोला अमृता फडणवीस यांनी अजित पवारांना लगावला.

अमृता फडणवीस म्हणाल्या, मला वाटतं महाराष्ट्र असं राज्य आहे जे खूप काही करू शकतं. सध्या खूप काही करतही आहे. यासाठी जनतेला जो माणूस आणि पक्ष योग्य वाटेल,ते न्याय देऊ शकेल असं वाटेल त्यांनी सत्तेत यावं. तेच आपल्या महाराष्ट्रासाठी चांगलं आहे. तो कुणीही असो.  प्रत्येक माणसाने विचार करावा की, तो फक्त प्रगतीसाठीच काम करणार आहे. स्वतःच्या घरासाठी काम करणार नाही.

दरम्यान, राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरशिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माध्यमांनाप्रतिक्रिया देत असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार बाजुला उभे होते.

 

उद्धव ठाकरेअर्थसंकल्पावर बोलत असताना अजित पवार कुणाला तरी डोळा मारतानाकॅमेऱ्याने अचूक टिपले होते. त्यानंतरअजित पवारांनी नेमका कुणाला डोळा मारला,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

पुढील बातम्या