मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  औकात, मॅडम चतुर अन् मिस फड-नॉईज.. अमृता फडणवीस व प्रियंका चतुर्वेदींमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

औकात, मॅडम चतुर अन् मिस फड-नॉईज.. अमृता फडणवीस व प्रियंका चतुर्वेदींमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

Mar 16, 2023, 11:36 PM IST

  • Amruta fadnavis blackmailing case : माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिने अमृता फडणवीस यांना धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीस व प्रियंका चतुर्वेदींमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

Amruta fadnavis blackmailing case : माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षाहिनेअमृता फडणवीस यांना धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. यावरूनठाकरे गटाच्या नेत्याव खासदारप्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

  • Amruta fadnavis blackmailing case : माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिने अमृता फडणवीस यांना धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देत ब्लॅकमेलिंग केल्याबद्दल मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी एक महिलेला अटक करण्यात आली आहे. माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे व आरोप मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिनेअमृता फडणवीस यांना धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

 

प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले आहे की, एका फरार गुन्हेगाराची मुलगी आधी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी मैत्री करते त्यांची मैत्री पाच वर्षे टिकते. ती उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला महागडे दागिने आणि कपडे देते. गाडीत त्यांच्यासोबत फिरते. ती डिझायनर सट्टेबाजांबद्दल तक्रार करून पैसे कसे कमावता येतील हे देखील सांगते. इतकं होऊनही मैत्री कायम राहते.

 

आता ब्लॅकमेलिंगचे आरोप होत आहेत. महाराष्ट्रात हे काय चाललंय? राज्याचे गृहमंत्री फडणवीस आहेत. महाराष्ट्राचे पोलीस त्यांना रिपोर्ट करतात. आणि या प्रकरणात फिर्यादी स्वत: फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तटस्थपणे चौकशी केली जायला हवी. हेच जर विरोधी पक्षातील कोणासोबत घडले असते तर उपमुख्यमंत्र्यांनी यावर नक्कीच मोठी कारवाई करत भ्रष्टाचाराचे आरोप लावायला सुरू केली असती आणि ईडी, सीबीआय किंवा एसआयटीतर्फे चौकशीचे आदेशही दिले असते.

 

प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटला अमृता फडणवीसांनी प्रत्य़ुत्तर दित म्हटलं आहे की, "मॅडम चतुर, हीच तुमची औकात" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मॅडम चतुर - आधी तुम्ही खोटा दावा केला होता की, मी अक्सिस बँकेला फायदा करून दिला आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? अर्थात - तुमचा विश्वास संपादन केल्यावर, जर कोणी-पैसे देऊन केसेस बंद करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधला असता तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाद्वारे मदत केली असती - तीच तुमची औक़ात आहे. मला माहीत आहे की, तुमची औक़ात म्हणजे मास्टर्स बदलणे आणि प्रामाणिक आणि स्वतंत्र महिलांना खाली खेचणे.

मिस चतुर, तुम्हाला स्वतंत्र तपासासाठी नाक खुपसण्याची काय गरज होती? मी स्वतः याची मागणी करत आहे. जेणेकरून या फसवणुकी मागील खऱ्या चेहऱ्यांसह सत्य उजेडात येऊ द्या," असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या