मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : अमृता फडणवीसांचा शिवसेना, उद्धव व आदित्य ठाकरेंबद्दल प्रश्न, राज ठाकरेंचे खुमासदार उत्तर

Raj Thackeray : अमृता फडणवीसांचा शिवसेना, उद्धव व आदित्य ठाकरेंबद्दल प्रश्न, राज ठाकरेंचे खुमासदार उत्तर

Apr 26, 2023, 10:35 PM IST

  • Raj Thackeray answer about uddhav thackeray : खासदार अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यांच्या प्रश्नांना राज यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

raj Thackeray

Raj Thackeray answer about uddhav thackeray : खासदार अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यांच्या प्रश्नांना राज यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

  • Raj Thackeray answer about uddhav thackeray : खासदार अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यांच्या प्रश्नांना राज यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

मुंबई–आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी राज ठाकरे प्रसिद्ध आहेत. त्यांची आज लोकमत परिवाराकडून मुलाखत घेण्यात आली. खासदार अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यांच्या प्रश्नांना राज यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

शिवसेनेची धुरा आज जर तुमच्या हाती असती तर अशी परिस्थिती आली नसती. राज्य हातात असताना एवढे शिवसैनिक पळून जाणं, एवढे नेते दूर होणे हे कधीच झालं नसतं, तुम्ही असता तर आज हे चित्र नसतं, तुम्ही सहमत आहात का? असा थेट प्रश्न अमृता फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला. यावर राज ठाकरे यांनी हेलिकॉप्टर, विमान आणि रॉकेटचा विनोद सांगून खुमसदार उत्तर दिलं.

यावर राज ठाकरे म्हणाले की, मला असं वाटतंय, पोलीस व्हॅनमधून घेऊन जातात आणि तुम्ही मध्ये बसलेले आहात. यावेळी मला दिवार चित्रपटातील डॉयलॉग आठवला आहे, 'मेरे साथ भाई बोल रहा है, की पुलिस की भेस में भाई बोल रहा है, मला असं वाटतंय मी तो विषय मी बंद केला आहे. त्याच गोष्टींना आता काही अर्थ नाही. झालं ते लोकांच्या समोर आहे. जे सांभाळतील ते सांभाळतील, मी वेगळा पक्ष काढला आहे. तो चालवतोय. एक विनोद आहे,एकदा हेलिकॉप्टर, विमान आणि रॉकेट बसलेले असतात. हेलिकॉप्टर म्हणतं की,पंखे फिरून-फिरून माझं डोकं दुखायला लागलं आहे. विमान पण म्हणतं की, मी इतक्या उंचावर उडतो ना वारं आल्यामुळे माझं नाक दुखायला लागतं. बाजूला रॉकेटला विचारलं तो म्हणाला, काय तुला सांगणार ज्याचं जळतं त्याला कळतं. त्याच्यामुळे मी पक्ष स्थापन केला माझं काय चाललंय हे मला माहिती आहे. मी आता दुसऱ्याच्या धुरा वाहणार नाही.

 

त्यानंतर अमृता फडणवीसांनी विचारले की, मी काही लोकांची नावं घेईन त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यानंतर अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेतला त्यावर राज म्हणाले, जपून राहा, देवेंद्र फडणवीस -वरती संबंध नीट ठेवा, अजित पवारांचे नाव घेतल्यावर म्हणाले काकांवर लक्ष ठेवा. तसेच यावर मी कोकणातील सभेत बोलणार असल्याचे राज म्हणाले. उद्धव ठाकरेंबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की, काय सांगणार मी, ते स्वयंभू आहेत. आदित्य ठाकरेंबाबतही राज यांनी तेच उत्तर दिले.

पुढील बातम्या