मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati: जेवणाच्या डब्याची पिशवी दुचाकीच्या हॅण्डलला अडकल्याने अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

Amravati: जेवणाच्या डब्याची पिशवी दुचाकीच्या हॅण्डलला अडकल्याने अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

Feb 27, 2023, 03:11 PM IST

  • Amravati Road Accident: अमरावती येथे रस्ता अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Road Accident In Nashik (HT)

Amravati Road Accident: अमरावती येथे रस्ता अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

  • Amravati Road Accident: अमरावती येथे रस्ता अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Amravati News: अमरावतीच्य नया अकोला मार्गावर झालेल्या रस्ता अपघात शनिवारी (२५ फेब्रुवारी २०२३) एक तरुण जागीच ठार झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जेवणाच्या डब्याची पिशवी दुचाकीच्या हॅण्डलला अडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल पाथरे (वय, २७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. निखिल पाथरे हा अमरावती येथे सर्वज्ञ ट्रॅक्टरमध्ये कार्यरत होता. घरची शेती सांभाळून तो सदरचे काम करीत होता. दरम्यान, निखिलने शनिवारी पहाटे शेतीतील नियमीत कामे आटोपल्यानंतर कामावर जाण्यासाठी निघाला. त्यावेळी त्याचा मित्र ऋषिकेशही त्याच्यासोबत अमरावतीला निघाला. आईने दिलेला जेवणाचा डब्याची पिशवी त्याने दुचाकीच्या हॅण्डलला अडकवली. मात्र, रस्त्यात गेल्यानंतर हॅण्डलला अडकवलेल्या पिशवीमुळे निखिलचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी झाडाला आदळल्याने निखिलचा जागीच मृत्यू झाला. तर, ऋषिकेश गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल रविवारी (२६ फेब्रुवारी २०२३) लग्नासाठी मुलगी पाहायला जाणार होता. लग्न करून विवाह बंधनात अडकण्याचे स्वप्न निखिलने बघितले होते. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली. या घटनेमुळे पाथरे कुटुंबियांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

पुढील बातम्या