मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambadas Danve: ‘सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून मस्ती आली असेल तर…’, अंबादास दानवेंची थेट पोलिसांना धमकी

Ambadas Danve: ‘सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून मस्ती आली असेल तर…’, अंबादास दानवेंची थेट पोलिसांना धमकी

Apr 02, 2023, 11:07 PM IST

    • Ambadas Danve Sambhaji Nagar : महाविकास आघाडीच्या सभेला येणाऱ्या गाड्या दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आल्यामुळं अंबादास दानवे पोलिसांवर चांगलेच संतापले.
Ambadas Danve Sambhaji Nagar (HT)

Ambadas Danve Sambhaji Nagar : महाविकास आघाडीच्या सभेला येणाऱ्या गाड्या दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आल्यामुळं अंबादास दानवे पोलिसांवर चांगलेच संतापले.

    • Ambadas Danve Sambhaji Nagar : महाविकास आघाडीच्या सभेला येणाऱ्या गाड्या दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आल्यामुळं अंबादास दानवे पोलिसांवर चांगलेच संतापले.

Maha Vikas Aaghadi Sabha Chhatrapati Sambhaji Nagar : शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची वज्रमुठ सभा आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे, जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मविआचे अनेक दिग्गज नेत्यांनी सभेला हजेरी लावली. या सभेच्या नियोजनाची धुरा स्थानिक आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे देण्यात आली होती. यावेळी सभेच्या दिशेनं येणारी वाहनं दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आल्याची माहिती समजताच अंबादास दानवे यांनी थेट पोलिसांनाच धमकी दिली. सत्ताधाऱ्यांच्या नादाला लागून जास्त मस्ती करू नका. पोलिसांना मस्ती आली असेल तर जिरवून दाखवू, असा धमकीवजा इशारा अंबादास दानवे यांनी संभाजीनगर पोलिसांना दिला आहे. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोडं फुटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर येथील सभेला मराठवाड्यासह राज्यभरातून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या जात असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला. तसेच कार्यकर्त्यांना दुसऱ्या मार्गानं जाण्यास सांगितलं जात असल्याचा आरोप करत दानवे यांनी थेट पोलिसांनाच दम दिला. सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांना जुबली पार्कजवळ येऊ देण्याचं आपलं ठरलेलं आहे. सध्या बाबा पेट्रोल पंपाजवळ किमान ८०० वाहनं उभी आहेत. आजचा दिवस तुमचा आहे. पण लक्षात ठेवा उद्याचा दिवस आमचा असेल. सत्ताधाऱ्याच्या नादाला लागून जास्त मस्ती करू नका, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी पोलिसांना धमकी दिली आहे.

बाबा पेट्रोल पंपासह केंब्रिज शाळा आणि जालना रोडवर महाविकास आघाडीच्या सभेला येणाऱ्या गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. अनेक पोलीस हे कार्यकर्त्यांच्या वाहनांना थांबवून त्यांना झालटा फाट्यावरून सभास्थळी पाठवत आहेत. त्यामुळं पोलिसांना जास्त मस्ती आली असेल तर ती जिरवून दाखवू, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांना धमकीवजा इशारा दिला आहे.

पुढील बातम्या