मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambadas Danve : किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोही; आक्षेपार्ह पेनड्राइव्ह सभागृहात सादर करताना अंबादास दानवे बरसले!

Ambadas Danve : किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोही; आक्षेपार्ह पेनड्राइव्ह सभागृहात सादर करताना अंबादास दानवे बरसले!

Jul 18, 2023, 03:40 PM IST

  • Ambadas Danve attacks Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्यांचे अश्लील व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत सादर केला.

Kirit Somaiya - Ambadas Danve

Ambadas Danve attacks Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्यांचे अश्लील व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत सादर केला.

  • Ambadas Danve attacks Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्यांचे अश्लील व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत सादर केला.

Ambadas Danve attacks Kirit Somaiya : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांचे अश्लील व्हिडिओ असेलला पेनड्राइव्ह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात सादर केला. 'किरीट सोमय्या यांची कृत्ये किळसवाणी असून ते महाराष्ट्रद्रोही आहेत. राज्य सरकारनं या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Heat Stroke Cases: महाराष्ट्रात ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्युची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

'लोकशाही न्यूज' या मराठी वृत्तवाहिनीनं किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ काल प्रसिद्ध केला होता. अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेतील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधकांनी सोमय्यांसह भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. अंबादास दानवे यांनी आज याबाबतचा पेनड्राइव्ह थेट सभागृहात आणला.

दानवे यांनी यावेळी किरीट सोमय्या व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या महाराष्ट्रातील संस्कृतीला काही राजकारणी छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. काही मंडळी ईडी-सीबीआयची भीती दाखवून लोकांना ब्लॅकमेल करत आहेत. खंडणी वसुली करत आहेत अशा बाबी समोर आल्या आहेत. स्व-पक्षातील महिलांना पद देतो, जबाबदारी देतो, मंडळं देतो, महामंडळं देतो. माझे सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सशी संबंध आहे असं सांगून त्यांची पिळवणूक व शोषण करत असल्याचं समोर आलं आहे, असं दानवे यांनी सांगितलं.

'जे राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतात, अशाच एका पक्षाचा एक बडा पदाधिकारी यात गुंतला आहे. काही महिला अधिकाऱ्यांना प्रलोभनं दाखवून त्याचं शोषण केल्याचं समोर आलं आहे. ही अपप्रवृत्ती आहे. त्यांची कृत्य समोर आली पाहिजेत म्हणून मी आज हा व्हिडिओ सभागृहात सादर करत आहे, असं दानवे म्हणाले.

'हे करणारा दुसरा-तिसरा कुणी नसून किरीट सोमय्या आहे. या माणसाला सीआयएसएफची, केंद्र सरकारची सुरक्षा आहे. या सुरक्षेचा गैरफायदा महिलांच्या शोषणासाठी केला जातोय की काय अशी शंका निर्माण होते. काही महिलांच्या असहाय्यतेचा फायदा या सोमय्यांनी घेतला आहे. तब्बल आठ तासांचे हे व्हिडिओ आहेत, अशी माहिती दानवे यांनी सभागृहाला दिली.

'सभापतींना सादर केलेल्या पेनड्राइव्हमध्ये मराठी स्त्रियांविषयी अतिशय अश्लील भाषेतील संभाषण आहे. या विषयी तपास करावा. मराठी महिलांविषयी अशा शब्दांत संभाषण करणारे किरीट सोमय्या हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रद्रोही आहेत. या उपऱ्या दलाला राज्य सरकार संरक्षण देणार का, असा सवाल दानवे यांनी सभागृहात केला. 'या पेनड्राइव्हचं अवलोकलन करून राज्य सरकारनं योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या