मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आधी म्हणाले अजितदादा चक्की पिसिंग, आता त्यांच्यासोबतच किसिंग; अंबादास दानवेंची भाजपवर सडकून टीका

आधी म्हणाले अजितदादा चक्की पिसिंग, आता त्यांच्यासोबतच किसिंग; अंबादास दानवेंची भाजपवर सडकून टीका

Aug 19, 2023, 05:15 PM IST

  • Ambadas Danve criticized Devendra Fadnavis: संभाजीनगरात माध्यामांशी बोलताना अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली आहे.

Ambadas Danve

Ambadas Danve criticized Devendra Fadnavis: संभाजीनगरात माध्यामांशी बोलताना अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली आहे.

  • Ambadas Danve criticized Devendra Fadnavis: संभाजीनगरात माध्यामांशी बोलताना अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली आहे.

Ambadas Danve On BJP: उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले. या अग्रलेखावर भाजपच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असताना विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेत फडणवीस यांना टोला लगावला. फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांना चक्की पिसिंगचा इशारा दिला होता. मात्र, फडणवीसांचे आता त्यांच्यासोबत किसिंग सुरू असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

bullet train project : नवी मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ३९४ मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण

Akola News : अमर प्रेम की कहाणी... पती-पत्नीचा ६० वर्षांचा सुखी संसार अन् दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

Pune Accident: रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारेंकडून पोलिसांचा ‘पंचनामा’, कोणते पब-बार किती हप्ते देतात? यादीच वाचून दाखवली

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झालं? जाणून घ्या लेटेस्ट आकडे!

महाराष्ट्रातील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले होते. त्यावेळी फडणवीस यांनी आमचे सरकार आल्यानंतर अजितदादा तरुंगात जातील, असा दावा केला होता. यावरून अंबादास दानवे यांनी फडणवीस यांच्यावर निशाला साधला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, "ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असणारे पुरावे घेऊन यायचं, आधी अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचं आणि आता अजितदादा किसिंग किसिंग चालू आहे."

छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेले केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यावरही यावेळी दानवेंनी निशाणा साधला. “भागवत करात हे चांगला माणूस आहेत. परंतु, चांगले नेते होऊ शकत नाहीत.” यावेळी अंबादास दानवे यांनी भावना गवळी आणि किरिट सोमय्या यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या