मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेना फोडण्यामागे भाजपचा हात? अजित पवार म्हणाले…

शिवसेना फोडण्यामागे भाजपचा हात? अजित पवार म्हणाले…

Jun 23, 2022, 10:24 PM IST

    • एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील अनिश्चितचे वातावरण आणखी गडद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यावर बैठक झाली. या बैठकीनंतर आज पहिल्यांना अजित पवार माध्यमांसमोर येऊन या सत्तानाट्यावर बोलले. या बंडामागे भाजपचा हात आहे का असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीनी करताच त्यांनी अजुन तरी यात भाजपचा हात दिसत नाही असे सांगिलते.
Deputy chief minister Ajit Pawar (HT_PRINT)

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील अनिश्चितचे वातावरण आणखी गडद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यावर बैठक झाली. या बैठकीनंतर आज पहिल्यांना अजित पवार माध्यमांसमोर येऊन या सत्तानाट्यावर बोलले. या बंडामागे भाजपचा हात आहे का असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीनी करताच त्यांनी अजुन तरी यात भाजपचा हात दिसत नाही असे सांगिलते.

    • एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील अनिश्चितचे वातावरण आणखी गडद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची यावर बैठक झाली. या बैठकीनंतर आज पहिल्यांना अजित पवार माध्यमांसमोर येऊन या सत्तानाट्यावर बोलले. या बंडामागे भाजपचा हात आहे का असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीनी करताच त्यांनी अजुन तरी यात भाजपचा हात दिसत नाही असे सांगिलते.

Maharashtra political crisis एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर राज्यात आज सर्वपक्षांनी आपल्या नेत्यांच्या बैठका घेतल्या. यात काँगे्रस आणि राष्ट्रवादीसह शिवसेनेनही बैठका घेतल्या. दरम्यान, सकाळी खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांना साद घालत आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहोत. मात्र, २४ तासांच्या आत तुम्ही मुंबईत या असे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे घटक पक्षांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची सिल्वर ओक येथे बैठक झाली. बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी या बंडामागे भाजप आहे का असे विचारताच सध्यातरी भाजप या प्रकारामागे दिसत नाही अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

 

अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट प्रश्न विचारला. यावर पवार म्हणाले, या प्रकाराच्या मागे सध्या तरी भाजपा हात दिसत नाही. कारण त्यांचा एकही मोठा त्या ठिकाणी गेलेला नाही. तसेच कोणत्याही प्रकारची चर्चा करतांनाही दिसत नाही. सत्ता स्थापनेसंदर्भात त्यांच्याकडून अजून कुठलीच पावले उचलली गेली नाही. त्यामुळे सध्या तरी भाजप या मागे असेल असे दिसत नाही.

अजित पवार यांच्या नंतर जयंत पाटील यांनाही हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यांनीही या घटनेमागे सध्यातरी भाजप असल्याचे दिसत नाही असे म्हणत क्लिनचिट दिली. या दोघांच्या वक्यव्यावर पक्ष प्रमुख शदर पवार यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी अजित पवारांना मुंबई बाहेरचे माहित नाही असे म्हणत राज्यातील स्थितीवर त्यांनी हे वक्तव्य केले असेल असे उत्तर दिले. दरम्यान, शरद पवार यांनी प्रमुख राष्ट्रीय पक्षांची यादी दाखवत या मागे एकनाथ शिंदे यांनी ज्या राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख केला तो सांगण्यासाठी कुठल्या भविष्य सांगणा-याची गरज नाही असे सांगितले.

दरम्यान या मागे मुख्यमंत्री आहेत का असे विचारल्यावरही पवार म्हणाले, मुख्यमंत्री साहेब साधे आहेत. त्यांचा स्वभाव पाहिला तर ते स्वताहून बंड घडवून आणतील असे वाटत नाही. मात्र, भाजपला त्यांनी क्लिनचिट दिल्याने अनेकांच्या भूवया मात्र नक्की उचवल्या आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या