मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : शिवरायांचा अपमान झाला तेव्हा दातखिळी बसली होती का?, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Ajit Pawar : शिवरायांचा अपमान झाला तेव्हा दातखिळी बसली होती का?, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Apr 02, 2023, 09:43 PM IST

    • Ajit Pawar Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर गौरव यात्रा काढल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली आहे.
Ajit Pawar LIVE (HT)

Ajit Pawar Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर गौरव यात्रा काढल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली आहे.

    • Ajit Pawar Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर गौरव यात्रा काढल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली आहे.

Maha Vikas Aaghadi Sabha Chhatrapati Sambhaji Nagar Live Updates : सावरकरांच्या अपमान झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावरकर गौरव यात्रा काढत आहेत, परंतु ज्यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यावेळी तुम्हाला दातखिळी बसली होती का?, असा खोचक सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. त्यात विरोधी पक्षनेते अजित पवार बोलताना म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी हे ज्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल होते, त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता. सत्ताधारी आमदार, मंत्री आणि प्रवक्त्यांनी देखील राज्यातील महापुरुषांचा अपमान करण्याचं काम केलं. मग त्यावेळी शिंदे-फडणवीसांची दातखिळी बसली होती का?, त्यावेळी गौरव यात्रा का काढण्यात आल्या नाहीत?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत अजित पवारांनी भाजप-शिंदे गटावर तुफान हल्लाबोल केला आहे.

महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा संभाजीनगरमध्ये होत असताना जाणीवपूर्वक दोन केंद्रीय मंत्री आणि राज्यातील तीन मंत्री शहरात सावरकर गौरव यात्रा काढत आहेत, गौरव यात्रा काढण्यास आमचा विरोध नाही, परंतु सरकारच्या दुटप्पीपणाला आमचा विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आलेले लोक शिवरायांचा अपमान झाल्यानंतर मात्र शांत होते, हे लोक विसरणार नाही आणि येत्या निवडणुकांमध्ये या लोकांना धडा शिकवला जाणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पुढील बातम्या