मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : आपत्तीच्या वेळी नियमांचा बाऊ नको; 'आउट ऑफ द वे' जाऊन काम करा - अजित पवार

Ajit Pawar : आपत्तीच्या वेळी नियमांचा बाऊ नको; 'आउट ऑफ द वे' जाऊन काम करा - अजित पवार

Jul 26, 2023, 07:03 PM IST

  • Ajit Pawar Review flood situation : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन राज्यातील पाऊस व पूरस्थितीचा आढावा घेतला.

Ajit Pawar

Ajit Pawar Review flood situation : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन राज्यातील पाऊस व पूरस्थितीचा आढावा घेतला.

  • Ajit Pawar Review flood situation : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन राज्यातील पाऊस व पूरस्थितीचा आढावा घेतला.

Ajit Pawar Review flood situation : राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात होत असलेला मुसळधार पाऊस, रायगडसह विविध ठिकाणी घडलेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिवृष्टी, पूरस्थिती व अवर्षण परिस्थितीचा आढावा घेतला. 'नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचवणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं हे सरकारचं पहिलं कर्तव्य आहे. हे करताना नियमाचा बाऊ करू नका. प्रसंगी ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन काम करण्याचा निर्णय घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडून अजित पवारांनी ठिकठिकाणची माहिती घेतली. 'जनहिताच्या प्रत्येक कार्यात सरकार तुमच्यासोबत आहे. आपत्ती निवारण, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत सतर्क राहून काम करावं, असंही त्यांनी सांगितलं.

नदी, नाल्यांचा प्रवाह अडवणारी अतिक्रमणं हटवा!

'राज्यात अनेक भागात नदी, नाले व ओढ्यात अतिक्रमण झाले आहे. नदी, नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अडल्यामुळं पूर परिस्थिती निर्माण होते. अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी नदी, नाल्यातील अतिक्रमण काढण्याचं काम प्राधान्यानं व कठोर भूमिका घेऊन पार पाडावं. नदी, नाल्यातील गाळ काढण्याचं काम कंत्राटदारांची यंत्रसामुग्री वापरून प्रशासनानं डिझेलची व्यवस्था करावी. १५ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करावी. तसंच, गाळ काढल्यानंतर तो पुन्हा नदी, नाल्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवारांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना काय सूचना दिल्या?

  • दरडप्रवण भागात इर्शाळवाडी, तळीये सारख्या घटना घडू नयेत यासाठी डोंगरी भागातील आदिवासी तांडे, पाडे यांचं अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी धोकादायक गावांची माहिती एकत्र करा.
  • धोकादायक क्षेत्रातील गावांचं पुनर्वसन करण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था, गावकऱ्यांची उपजीविका या सर्व बाबींचा विचार करून प्रस्ताव तयार करा.
  • धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावं. पूरस्थितीमूळं मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीनं द्यावी.
  • शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरू करावेत. ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखील पंचनामे त्वरित सुरू करावेत. खरडून गेलेल्या जमिनी पुन्हा वापरात आणता याव्यात यासाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा तयार करावा.

Jayant Patil : जत तालुका दुष्काळी जाहीर करा; जयंत पाटील यांनी मांडलं दाहक वास्तव

  • बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचं वाटप तातडीनं त्याच दिवशी होईल याकरीता प्रशासनानं स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा.
  • ज्यांच्या घरात पुराचं पाणी शिरलं होतं, त्यांना तातडीनं सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीनं सुरू करावी. रोगराई पसरू नये याकरिता स्वच्छता करणं, औषध फवारणी करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीनं करण्यात याव्यात.
  • ज्या ठिकाणी पाणी दूषित झालं आहे, त्या ठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात. गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा.

  • 'पुरामुळे ज्या गावात घरात, रस्त्यावर गाळ साचला असेल तिथं स्वच्छता करण्यासाठी ‘राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधी’ तसेच जिल्हा परिषदेतील निधीचा उपयोग करावा.
  • प्रत्येक जिल्ह्याला दिलेला ३० लाख रुपयांचा आगाऊ निधी वापरावा. निधी कमी पडल्यास तातडीनं मागणी करण्याची सूचना देखील त्यांनी दिली.
  • ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं रस्त्यांची हानी झाल्यानं गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागानं तातडीनं दुरुस्ती करावी. पुरामुळं ज्या शालेय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य खराब झालं आहे, त्यांना शिक्षण विभागानं शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावं.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या