मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nawab Malik : “आम्ही त्यांच्याशी कुठलीही.." फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार गटाची नवाब मलिकांबाबत भूमिका आली समोर

Nawab Malik : “आम्ही त्यांच्याशी कुठलीही.." फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार गटाची नवाब मलिकांबाबत भूमिका आली समोर

Dec 07, 2023, 11:36 PM IST

  • Ajit Pawar Group on Nawab Malik : नवाब मलिक मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर अजित पवार गट काय भूमिका घेणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले असताना आता अजित पवार गटाची भूमिका समोर आली आहे.

Ajit Pawar Group on Nawab Malik

Ajit Pawar Group on Nawab Malik : नवाब मलिक मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर अजित पवार गट काय भूमिकाघेणार?याकडे महाराष्ट्राचं लक्षलागले असतानाआता अजित पवार गटाची भूमिका समोर आली आहे.

  • Ajit Pawar Group on Nawab Malik : नवाब मलिक मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर अजित पवार गट काय भूमिका घेणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले असताना आता अजित पवार गटाची भूमिका समोर आली आहे.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी कोणाला समर्थन द्याचे ही भूमिका स्पष्ट करत अजित पवार गटाला समर्थन दिले. मलिक अधिवेशनातसत्ताधारी बाकावर बसल्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. नवाब मलिक यांच्यावर भाजपाने देशद्रोहासह अनेक आरोप केले होते.याप्रकरणी ते तुरुंगातही जाऊन आले आहेत. ते सध्या वैद्यकीय कारणांमुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. अशातच ते आज भाजपा, शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या आमदारांबरोबर सत्ताधारी बाकावर बसले.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे विधान परिषदेत शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाला धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित केले.

नवाब मलिकअजित पवार गटाच्या आमदारांसोबत सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले. तसेच ते अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसले. त्यामुळे ते अजित पवार गटात गेल्याचं स्पष्ट झालं होतं. याशिवाय अजित पवार यांनीदेखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण त्यांचं स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकयांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यांनी तसं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलं आहे.

यावर अजित पवार गट काय भूमिका घेणार? याकडे महाराष्ट्राचं लक्षलागले असताना आता अजित पवार गटाची भूमिका समोर आली आहे.

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवाब मलिक यांच्याबाबतची भूमिका ट्विटरवर (X) मांडली आहे. त्यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं हे ट्विट अजित पवार यांनीदेखील रिट्विट केलं आहे.

“आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे”,असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या