मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BS Koshyari : पहाटेच्या शपथविधीविषयी भगतसिंह कोश्यारींचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

BS Koshyari : पहाटेच्या शपथविधीविषयी भगतसिंह कोश्यारींचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

Feb 20, 2023, 06:00 PM IST

  • BS Koshyari On Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे.

Bhagat Singh Koshyari (HT)

BS Koshyari On Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे.

  • BS Koshyari On Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे.

Bhagat Singh Koshyari Interview : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त राज्यपाल राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन माझ्याकडे आले होते. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर सरकार होत असताना मी राष्ट्रपती राजवट का उठवू नये?, असा सवाल करत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कोश्यारींनी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर नेमकं काय झालं होतं, याचा खुलासा केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना घेऊन माझ्याकडे आले. त्यांच्याकडे आमदारांच्या सह्यांचं पत्र होतं, राजकारणात एका क्षणात गोष्टी बदलतात, मग एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली तर त्याचं नवल कशासाठी?, राष्ट्रवादीचे नेते माझ्याकडे आल्यानंतर 'बहुमत असेल तर सिद्ध करा', असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचंही भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

पहाटेच्या शपथविधीची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना होती, असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर शरद पवारांना 'जर आणि तर' ची भाषा करावी लागत असेल त्यांना लवासाच्या प्रकरणावर दहा वेळा विचार करावा लागेल. फडणवीसांना प्रत्युत्तर देताना ते राजकीय बोलत आहेत, असंही कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात अनेक पक्षांना सत्तास्थापनेचं निमंत्रण देण्यासाठी माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता. शिवसेनेनं मला वेळ मागितला मी त्यांना तो दिला. परंतु त्यानं ते सुप्रीम कोर्टात गेले. घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यामुळं मी सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी दिलेला वेळ कमी करून दिला. या सगळ्या प्रकरणात माझी भूमिका संदिग्ध कशी काय?, असाही सवाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. सकाळी आठ वाजता शपथविधी झाला, तरीदेखील अनेक लोक त्याला पहाटेचाच शपथविधी म्हणतात, याला काहीही अर्थ नसल्याचंही कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

पुढील बातम्या