मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ahmednagar News : मित्रांसह पिकनिकला गेलेल्या तरुणीचा सांदण दरीत पडून मृत्यू

Ahmednagar News : मित्रांसह पिकनिकला गेलेल्या तरुणीचा सांदण दरीत पडून मृत्यू

Dec 24, 2023, 07:45 PM IST

  • Girl falling Into Sandhan Valley : अहमदनगर जिल्ह्यातील सांदण दरीत पडून तरुणीचा मृत्यू झाला आहे. 

Girl falling Into Sandhan Valley

Girl falling Into Sandhan Valley : अहमदनगर जिल्ह्यातील सांदण दरीत पडून तरुणीचा मृत्यू झाला आहे.

  • Girl falling Into Sandhan Valley : अहमदनगर जिल्ह्यातील सांदण दरीत पडून तरुणीचा मृत्यू झाला आहे. 

सलग सुट्ट्यांमळे राज्यातील सर्व पर्यटनस्थळे लोकांच्या गर्दीने फुलली आहेत. पिकनिकच्या ठिकाणी अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघाताच्या घटना घडत असतात. अशीच एक दु:खद घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. सांदण दरी पाहण्यासाठी आलेल्या एका पर्यटक तरुणीचा मृत्यू दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. ऐश्वर्या खानविलकर (२४ वर्षे) असं या मृत तरुणीचं नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

 

रविवारी सकाळी ११वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. ऐश्वर्या आपल्या मित्र-मैत्रिणींसह सांदण दरी पाहण्यासाठी आली होती. सलग सुट्ट्या असल्याने तिच्या मित्र परिवाराने पिकनिकचा प्लान केला होता. आज सकाळीच ते सांदण दरीजवळ पोहोचले. यावेळी ऐश्वर्याचा पाय घसरला व ती खोल दरीत कोसळली. 

दरीत डोकावून पाहताना ही तरुणी खाली पडली. त्यावेळी तिच्या आजुबाजूला तिला पटकन सावरण्यासाठी कोणीच नव्हतं. त्यामुळे ती खोल दरीत कोसळली. बऱ्याच उंचावरून दरीत पडल्याने तिच्या हातापायांना तसेच डोक्याला गंभीर मार लागला व जागीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  स्थानिकांच्या मदतीने मुलीचा मृतदेह दरीतून वर काढला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या