मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhananjay Munde : ‘कृषीमंत्र्यांनी आमची फसवणूक केली’; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचा आरोप

Dhananjay Munde : ‘कृषीमंत्र्यांनी आमची फसवणूक केली’; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचा आरोप

Oct 26, 2023, 07:15 PM IST

  • dhananjay munde Nne: राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलींना मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिने उलटून गेल्यावर सुद्धा कोणतीही मदत मिळाली नसल्याचे या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

यवतमाळ येथे १८ ऑगस्ट २०२३ रोजी आत्महत्या केलेले शेतकरी मनोज राठोड यांच्या मुलींनी कृषीमंत्री मुंडे यांची भेट घेतली होती (संग्रहित छायाचित्र)

dhananjay munde Nne: राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलींना मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिने उलटून गेल्यावर सुद्धा कोणतीही मदत मिळाली नसल्याचे या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

  • dhananjay munde Nne: राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलींना मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिने उलटून गेल्यावर सुद्धा कोणतीही मदत मिळाली नसल्याचे या कुटुंबियांचे म्हणणे आहे.

कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळं राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाहीए. त्यातच सरकारी यंत्रणेनेसुद्धा राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडून दिल्याचे चित्र आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. या जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या एका तरुण शेतकऱ्याच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतो असं जाहीर आश्वासन देणारे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी गेले दोन महिने उलटून गेल्यावरही या मुलींना कृषीमंत्र्यांकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे राज्याच्या कृषीमंत्र्यांनी आमची फसवणूक केली असल्याची भावना यवतमाळच्या या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

यवतमाळ दौऱ्यादरम्यान कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मुलींना दिलं होतं मदतीचं आश्वासन

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील येरद येथील रहिवासी शेतकरी मनोज कवडू राठोड (वय ३७) यांच्यावर बँक ऑफ बडोद्याचे अडीच लाख रुपयांचे कर्ज होते. शिवाय राठोड यांनी इतर खासगी सावकारांकडून कर्ज उचलले होते. राठोड यांच्या कुटुंबात त्यांची आई, पत्नी आणि चार मुलींसह एकूण सहा सदस्य आहेत. यंदा पाऊस जास्त झाल्याने मनोज राठोड यांच्या शेतात खूप तण वाढले होते. बँकेच्या कर्जामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेले राठोड यांनी टोकाचे पाऊल उचलत देशाच्या स्वातंत्रदिनी म्हणजे १५ ऑगस्ट २०२३ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

दरम्यान १८ ऑगस्ट रोजी यवतमाळ शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयाच्या उदघाटनासाठी खुद्द कृषीमंत्री धनंजय मुंडे यवतमाळ शहरात आले होते. कृषीमंत्री मुंडे यांनी आत्महत्या केलेले शेतकरी राठोड यांची पत्नी आणि चार मुलींना पक्ष कार्यालयात बोलवून घेतले होते. या कुटुंबियांना भेटून कृषीमंत्री मुंडे सुद्धा भावूक झाले होते. या कुटुंबीयांना मदत करण्याचे आदेश त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. शिवाय आत्महत्या केलेले शेतकरी मनोज राठोड यांच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्वांसमोर जाहीर केले होते. परंतु या भेटीला आता दोन महिने उलटून गेले आहेत. गेल्या दोन महिन्यात कृषीमंत्र्यांकडून काहीही उत्तर मिळाले नसल्याचे राठोड कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कृषीमंत्री मुंडेंवर टिका

सरकारमधील मंत्र्यांमध्ये जाहिरातबाजीसाठी स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेण्याची शर्यत लागली असून दसरा मेळाव्या भाषण करताना मुख्यमंत्री ओरडून ओरडून स्वतःला शेतकरी पुत्र असल्याचे सांगत होते. त्यापूर्वी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळ येथील आत्महत्या केलेले शेतकरी मनोज राठोड यांच्या चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याची घोषणा केली आणि स्वतःला संवेदनशील शेतकरी पुत्र म्हणत जाहिरातबाजी केली. आता दोन महिने होऊन गेले पण कुटुंबीयांकडे कोणी गेले नाही, फोन वर विचारणा ही केली नाही. स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेणारे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देऊ शकत नाही. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिलेला शब्द पूर्ण करू शकत नाही. मदत करायची नाही तर करू नका पण किमान लोकांच्या भावनांशी तरी खेळू नका, अशी टिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यवतमाळमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीची भेट घेतल्यानंतर ट्विटरवर खालील व्हिडिओ शेअर केला होता.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या