मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vedanta-Foxconn : आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंच्या नव्या आरोपांनी खळबळ

Vedanta-Foxconn : आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंच्या नव्या आरोपांनी खळबळ

Sep 14, 2022, 06:04 PM IST

    • Vedanta-Foxconn Project In Talegaon : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा आदित्य ठाकरेंनी केल्यानं खळबळ उडाली आहे.
Aditya Thackeray On Vedanta-Foxconn Project In Talegaon Pune (HT)

Vedanta-Foxconn Project In Talegaon : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा आदित्य ठाकरेंनी केल्यानं खळबळ उडाली आहे.

    • Vedanta-Foxconn Project In Talegaon : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा आदित्य ठाकरेंनी केल्यानं खळबळ उडाली आहे.

Aditya Thackeray On Vedanta-Foxconn Project In Talegaon Pune : पुणे जिल्ह्यातील तळेगावमध्ये प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. त्यावर राजकीय वादंग सुरू असतानाच आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर नेल्याचा आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता शिवसेना विरुद्ध सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप असा नवा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्तेत असताना मी आणि तात्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई दावोसला गेलो होतो. त्यावेळी आम्ही तीन दिवसांत ८० हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आणली होती. परंतु आता शिंदे-फडणवीस या खोके सरकारच्या निष्काळजीपणामुळं वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये गेलाच परंतु आता रत्नागिरीतील बल्क ड्रग पार्क हा प्रोजेक्टही राज्याबाहेर गेला आह. असं सांगत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे.

बल्क ड्रग पार्क प्रोजेक्टच्या माध्यमातून राज्यात पावणेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. घटनाबाह्य सरकारनं ४० आमदारांसह अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राज्याबाहेर न्यायला सुरुवात केली आहे. रत्नागिरीतील या प्रकल्पामुळं कोकणातील ७० हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार होतं. परंतु हा प्रकल्पही आपल्या हातातून कसा गेला? तो गुजरातच्या भरूचमध्येच का गेला?, सातत्यानं गणेश दर्शनात व्यस्त असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची कल्पना आहे का?, असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

कोणत्याही राज्यात केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय गुंतवणूक येऊ शकत नाही. केंद्राला पाठपुरावा करून आम्ही अनेक प्रकल्प आणले होते. त्यातलाच बल्क ड्रग पार्क हा प्रोजेक्टही होता. परंतु आता तो राज्याबाहेर गेल्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे.

पुढील बातम्या