मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohit Pawar: शिवसेना फोडल्यानंतर विरोधकांचे पुढचे टार्गेट पवार कुटुंब; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

Rohit Pawar: शिवसेना फोडल्यानंतर विरोधकांचे पुढचे टार्गेट पवार कुटुंब; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

Oct 18, 2022, 04:35 PM IST

    • Pawar Family : रोहित पवार (Rohit pawar) म्हणाले की, शिवसेना पक्षानंतर आता विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडण्याचा डाव आहे. पक्षाबरोबरच विरोधक पवार कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

Pawar Family : रोहित पवार (Rohit pawar) म्हणाले की,शिवसेना पक्षानंतर आता विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडण्याचा डावआहे. पक्षाबरोबरच विरोधक पवार कुटुंबातफूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.

    • Pawar Family : रोहित पवार (Rohit pawar) म्हणाले की, शिवसेना पक्षानंतर आता विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडण्याचा डाव आहे. पक्षाबरोबरच विरोधक पवार कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई–शिवसेनेत बंड (shiv sena) घडवून आणून पक्षात उभी पाडल्यानंतर पवार कुटूंबात फूट (divide pawar family) पाडण्याचा कुटील डाव विरोधकांचा असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवारांच्या या आरोपानंतर राज्यातील राजकारण वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान रोहित पवारांच्या आरोपावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा आरोप केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

दरम्यान रोहित पवारांच्या आरोपानंतर याबाबत विचारल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, रोहितने नेमकं कशामुळे वक्तव्य केलं हे पाहावं लागेल, त्याच्याशी बोलावं लागेल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने शिवसेना दुभंगली असून ठाकरे कुटूंबाला मोठा फटका बसला आहे. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेत बंड घडल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले होते. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं.राज्यातील या सत्तांतराबरोबरच ठाकरे कुटूंबाला या फुटीचा मोठा फटका बसला होता. पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे कुटूंबातही फूट पडल्याचे पाहायला मिळाले. शिंदेगटाच्या दसरा मेळाव्यात ठाकरे कुटूंबातील जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे व निहार ठाकरे आदि सदस्य शिंदे गटाच्या स्टेजवर पाहायला मिळाली होती. शिवसेनेत व ठाकरे कुटूंबात फूट पाडल्यानंतरआता पवार कुटुंबाताही अशीच फूट पाडण्याचा डाव विरोधक आखत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, शिवसेना पक्षानंतर आता विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडण्याचा डाव आहे. पक्षाबरोबरच विरोधक पवार कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. मात्र, विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी राष्ट्रवादी पक्षात व पवार कुटुंबात फूट पडणार नाही, असा ठाम विश्वास असल्याचे रोहित पवार म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे केंद्रात आहेत, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आम्ही राज्यात आहोत, त्यामुळे पक्षात संघर्ष होण्याचं कारणच नाही, असे रोहित पवार म्हणाले.

 

पुढील बातम्या