मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Economy Of India : थोडी प्रतीक्षा करा.. आता जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल भारत!

Economy Of India : थोडी प्रतीक्षा करा.. आता जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल भारत!

Sep 03, 2022, 10:32 PM IST

    • जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या बाबतीत भारताने ब्रिटनला मागे टाकून पाचवे स्थान काबीज केले आहे.ही घोडदौड पुढेही अशीच सुरू राहणार आहे आणि भारत येणाऱ्या काही वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. असा अहवाल तज्ज्ञांनी दिला आहे.
जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल भारत!

जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या बाबतीत भारतानेब्रिटनला मागे टाकून पाचवे स्थान काबीज केले आहे.ही घोडदौड पुढेही अशीच सुरू राहणार आहे आणिभारत येणाऱ्या काही वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. असा अहवाल तज्ज्ञांनी दिला आहे.

    • जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या बाबतीत भारताने ब्रिटनला मागे टाकून पाचवे स्थान काबीज केले आहे.ही घोडदौड पुढेही अशीच सुरू राहणार आहे आणि भारत येणाऱ्या काही वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. असा अहवाल तज्ज्ञांनी दिला आहे.

जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या बाबतीत भारताने ब्रिटनला मागे टाकून पाचवे स्थान काबीज केले आहे. आता देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद विरमानी यांनी म्हटले आहे की, ही घोडदौड पुढेही अशीच सुरू राहणार आहे आणि भारत येणाऱ्या काही वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना त्यांनी म्हटले की, मागील वर्षी आपण सहाव्या स्थानी होतो. २०२२ मध्ये आशा होती की, आपण जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू.अरविंद विरमानी यांनी म्हटले की, भारत आर्थिक बाबतीत तेजीने पुढे जात आह आणि २०२८-३० पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत असेल.

एसबीआयच्या रिपोर्टमध्ये काय म्हटले आहे –

दरम्यान एसबीआयच्या इकोनॉमिक रिसर्च डिपार्टमेंटच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारत सन २०२९ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. २०१४ मध्ये जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा नंबर दहावा होता. त्यामुळे १५ वर्षात यामध्ये सात स्थानांचा बदल दिसू शकतो. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष म्हणजे आयएमएफच्या आकड्यांनुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हून खूप मागे नाही. आयएमएफचे म्हणणे आहे की, जवळपास ८५४ बिलियन डॉलरचे यामध्ये अंतर आहे.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारत जगातील ५ वी सर्वात मोठी इकोनॉमी बनला आहे. भारताने ब्रिटनला मागे टाकून हे स्थान मिळवले आहे. हा रिपोर्ट अशा वेळी आला आहे, जेव्हा देशातील पहिली तिमाही म्हणजे एप्रिल-जून मधील जीडीपीचे आकडे समोर आले आहेत. भारताची जीडीपी १३.५ टक्के राहिली आहे. जी एका वर्षातील सर्वात गतिमान आहे. त्याचबरोबर भारत जगातील सर्वात गतीने वाढत असलेली अर्थव्यवस्था हा टॅगही कायम आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या