मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  परब यांच्यावरील कारवाईमुळं सदावर्तेंना मोठा आनंद; गाणं म्हणत वाटले लाडू

परब यांच्यावरील कारवाईमुळं सदावर्तेंना मोठा आनंद; गाणं म्हणत वाटले लाडू

May 26, 2022, 03:09 PM IST

    • घोटाळा करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिल्यावर हा गुण लागणारच, वाण नाही पण गुण लागतोच अशी टीकाही सदावर्तेंनी केली आहे.
अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

घोटाळा करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिल्यावर हा गुण लागणारच, वाण नाही पण गुण लागतोच अशी टीकाही सदावर्तेंनी केली आहे.

    • घोटाळा करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिल्यावर हा गुण लागणारच, वाण नाही पण गुण लागतोच अशी टीकाही सदावर्तेंनी केली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी आज ईडीने धाड टाकली. शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी ईडीने सकाळी छापा टाकत चौकशी सुरु केली आहे. दापोलीतील अनिल परब यांच्या रिसॉर्टवरही ईडीचे पथक दाखल झाले आहे. ईडीने अनिल परब यांच्यावर सुरु केलेल्या या कारवाईमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे. तर मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई सुरु केल्याचा अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना आनंद झाल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

अनिल परब यांच्यावरील कारवाईनंतर अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जल्लोष साजरा केला आहे. त्यांनी चक्क लाडू वाटून आनंद साजरा करत प्रतिक्रिया दिली. सदावर्ते म्हणाले की, "एसटी संपाच्या काळात परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांकडे संवेदनशीलतेनं पाहिलं नाही. त्यांच्यावर झालेली कारवाई ही त्यांच्या कर्मचाचे फळ आहे. पैशाची चटक लागल्यानं अनिल परब यांनी गैरव्यवहार केला. आम्ही सांगत होतो तेव्हा आमचं म्हणणं ऐकलं नाही."

ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वाण नाही पण गुण लागला. लवासा घोटाळा, सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळा करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिल्यावर हा गुण लागणारच, वाण नाही पण गुण लागतोच अशी टीका गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे. तसंच एसटी कर्मचाऱ्यांची हळहळ आणि तळतळीचे हे परिणाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे पद दुसऱ्याला द्यायला पाहिजे होतं. ही तर कर्माची फळं आहेत असंही सदावर्ते म्हणाले.

अनिल परब यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते यांनी जैसी करणी वैसी भरनी असं गाणं म्हटलं. तसंच ते म्हणाले की, "जेव्हा मी तुरुंगात गेलो तेव्हा भारत माता की जय अशा घोषणा देत गेलो. पण आज काही लोक दरावाजाच्या फटीतून दिसत आहेत." ईडीने छापा टाकल्यानंतर अनिल परब यांचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये अनिल परब दरवाजाच्या फटीतून दिसत असून यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. दरम्यान, अनिल परब यांच्यावरील कारवाईनंतर गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत काही एसटी कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

पुढील बातम्या