मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Disha Salian Case : आदित्य ठाकरे कायदेशीर कारवाईच्या तयारीत!, तर उद्धव ठाकरे सर्व फौज घेऊन नागपुरात

Disha Salian Case : आदित्य ठाकरे कायदेशीर कारवाईच्या तयारीत!, तर उद्धव ठाकरे सर्व फौज घेऊन नागपुरात

Dec 25, 2022, 10:14 PM IST

  • दिशा सालियन प्रकरणात सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत आदित्य ठाकरे कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.  आदित्या यांना केलेल्या निशाण्यामुळे उद्धव ठाकरेही  ॲक्शन मोडमध्ये आले असून भात्यातील सर्व बाण घेऊन नागपूरला रवाना झाले आहेत. 

आदित्य व उद्धव ठाकरे

दिशा सालियन प्रकरणात सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत आदित्य ठाकरे कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. आदित्या यांना केलेल्या निशाण्यामुळे उद्धव ठाकरेही ॲक्शन मोडमध्ये आले असून भात्यातील सर्व बाण घेऊन नागपूरला रवाना झाले आहेत.

  • दिशा सालियन प्रकरणात सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत आदित्य ठाकरे कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.  आदित्या यांना केलेल्या निशाण्यामुळे उद्धव ठाकरेही  ॲक्शन मोडमध्ये आले असून भात्यातील सर्व बाण घेऊन नागपूरला रवाना झाले आहेत. 

Disha Salian case : हिवाळी अधिवेशनात भाजप आमदारांनी दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंवर टीका करताना त्यांच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्यानंतर सातत्याने होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून याप्रकणी आदित्य ठाकरे न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. आदित्य ठाकरे सध्या कायदेशीर सल्ला घेत असून लवकरच न्यायालयात जाणार असल्याचे वृत्त आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

दुसरीकडे आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या या आरोपांनंतरउद्धव ठाकरेहीॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सर्व निष्ठावंतांची फौज घेऊन उद्धव ठाकरे मुंबईहून नागपूरला रवाना होणार आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई सोमवारी नागपूरला हिवाळी अधिवेशनासाठी दाखल होणार आहेत.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा नागपूर दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. उद्धव ठाकरे हे अधिवेशनात सहभागी होणार आहेत,तर संजय राऊत विधिमंडळ भेट घेणार आहेत.

दिशा सालियान प्रकरणी होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे कोर्टात जाणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. बदनामी करणाऱ्यांविरोधात आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणी टीकेचा सामना करावा लागत आहे. भाजप नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांना या प्रकरणावरुन वारंवार टार्गेट केलं जात आहे.

दरम्यान नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल करत दिशा सालियान प्रकरणात आदित्य तुरुंगात जाणार म्हणजे जाणारच असे म्हटले आहे.

 

पुढील बातम्या