मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nerul Crime : पाण्याच्या नळावरून महिलेचा गळा दाबून तरुणावर चाकूने वार; आरोपी घरमालकाच्या मुलाला अटक

Nerul Crime : पाण्याच्या नळावरून महिलेचा गळा दाबून तरुणावर चाकूने वार; आरोपी घरमालकाच्या मुलाला अटक

Jan 18, 2023, 03:03 PM IST

    • Nerul Crime News : क्षुल्लक कारणावरून नेरूळमध्ये घरमालकाच्या मुलानं मायलेकावर धारदार शस्त्रानं वार केल्याची घटना समोर आली आहे.
Nerul Mumbai Crime News Marathi (HT_PRINT)

Nerul Crime News : क्षुल्लक कारणावरून नेरूळमध्ये घरमालकाच्या मुलानं मायलेकावर धारदार शस्त्रानं वार केल्याची घटना समोर आली आहे.

    • Nerul Crime News : क्षुल्लक कारणावरून नेरूळमध्ये घरमालकाच्या मुलानं मायलेकावर धारदार शस्त्रानं वार केल्याची घटना समोर आली आहे.

Nerul Mumbai Crime News Marathi : रात्री उशिरा पाण्याचा नळ सुरू केल्याच्या वादातून नेरूळमध्ये मायलेकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी तरुणानं फिर्यादीच्या आईचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, याशिवाय भांडणं सोडायला गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्रानं वार केल्यानंतर आता पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक केली आहे. याशिवाय हल्ल्यात वापरण्यात आलेले धारदार शस्त्रंही पोलिसांनी जप्त केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील शिरवणेत नवनीत जैस्वार हे आपल्या कुटुंबियांसह भाड्याच्या खोलीत राहत होते. संध्याकाळी ते घरी आले असता त्यांच्या आईनं पाण्याची टाकी भरण्यासाठी नळ चालू केला. परंतु नळ चालू केल्यामुळं संतापलेल्या घरमालकाच्या मुलानं त्यांना शिवीगाळ करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आईचा आरडल्याचा आवाज येत असल्यामुळं नवनीत यांनी खाली धाव घेतली. त्यावेळी आरोपी किरणनं त्यांच्यावरही चाकूने वार करत त्यांना जखमी केलं. कॉलनीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडल्याचं समजताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यानंतर आता नवनीत यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासांच्या आतच आरोपीला अटक केली आहे. याशिवाय जखमींना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईसह उपनगरांमध्ये सातत्यानं गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता महिलेसह तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आल्यानंतर नेरूळमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या