मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aashadhi Wari 2023 : माऊलींची पालखी पंढरपुरच्या दिशेने; कोणत्या पालखीचा मुक्काम कुठे?, पाहा अपडेट्स

Aashadhi Wari 2023 : माऊलींची पालखी पंढरपुरच्या दिशेने; कोणत्या पालखीचा मुक्काम कुठे?, पाहा अपडेट्स

Jun 23, 2023, 11:56 AM IST

    • Palkhi Sohala Pandharpur : आषाढी वारीसाठी राज्यातील अनेक भागांतून पालख्या शेकडो किमीचं अंतर कापत पंढरपुरात दाखल होत आहे.
Palkhi Sohala Pandharpur Aashadhi Wari 2023 (HT_PRINT)

Palkhi Sohala Pandharpur : आषाढी वारीसाठी राज्यातील अनेक भागांतून पालख्या शेकडो किमीचं अंतर कापत पंढरपुरात दाखल होत आहे.

    • Palkhi Sohala Pandharpur : आषाढी वारीसाठी राज्यातील अनेक भागांतून पालख्या शेकडो किमीचं अंतर कापत पंढरपुरात दाखल होत आहे.

Palkhi Sohala Pandharpur Aashadhi Wari 2023 : टाळ मृदूंगाच्या हरिनामाचा गजर करत राज्याच्या अनेक भागातील मानाच्या पालख्या पंढपुराच्या दिशेने प्रवास करत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ आणि मुक्ताईंच्या पालख्या पुढील एक ते दोन दिवसांत पंढरपुरात दाखल होणार आहे. येत्या २६ जून रोजी आषाढी वारी असल्याने राज्यभरातून वारकरी पंढरपुरात दाखल होत आहे. त्यामुळं आता सोलापुरसह पंढरपुरात पुढील काही दिवस लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होणार आहे. जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या गर्दीचं नियोजन करण्यास सुरुवात केली असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local : मुंबईत वादळी पावसाने ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत; ठाणे, घाटकोपर स्टेशनवर तुडूंब गर्दी, नोकरदारांचे हाल

Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू; सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह राज्यभरात वादळी वारे अन् अवकाळीचा तडाखा, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली

VIDEO : मुंबईत एका तासातच पावसाने हाहाकार..! पार्किंग लिफ्ट कोसळली, पेट्रोल पंपावर होर्डिंग्ज कोसळून ८ जण ठार, ६० जखमी

कोणती पालखी सध्या कुठे?

संत तुकाराम महाराज यांनी पालखी पुण्यातील इंदापूर तालुक्यातून सोलापुरच्या अकलूजच्या दिशेने प्रवास करत आहे. गुरुवारी तुकोबांच्या पालखीचा इंदापुरात मुक्काम होता. यावेळी स्थानिक आमदार दत्ता भरणे यांनी पालखीचं दर्शन घेतलं आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती आहे. निवृत्तीनाथ महाराज यांची पालखीने गुरुवारी जेऊर येथे मुक्काम केला आहे. आज सकाळपासून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तर जवळा येथे मुक्काम केल्यानंतर संत मुक्ताबाईंची पालखी आज संध्याकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. मुक्ताबाईंच्या पालखीचा शुक्रवारी शेंद्री गावात मुक्काम असणार आहे.

आषाढी वारीनिमित्त ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय...

राज्यभरातून अनेक पालख्या पंढरपुरच्या दिशेने प्रवास करत असतानाच संभाजीनगरमधून अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीच्याच दिवशी बकरी ईद आल्याने वाळूज एमआयडीसी परिसरातील मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वारकरी संप्रदाय आणि मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमधून हिंसाचाराच्या घटना समोर येत असताना संभाजीनगरमध्ये हिंदू-मुस्लिम एकीचं दर्शन घडलं आहे.

पुढील बातम्या