मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aashadhi Wari 2023 : वारीसाठी पालख्या पंढरपुरच्या दिशेने; कोणती पालखी कोणत्या शहरात?, पाहा अपडेट्स

Aashadhi Wari 2023 : वारीसाठी पालख्या पंढरपुरच्या दिशेने; कोणती पालखी कोणत्या शहरात?, पाहा अपडेट्स

Jun 22, 2023, 06:54 AM IST

    • Palkhi Sohala Pandharpur : आषाढी वारीसाठी निघालेल्या अनेक पालख्या सध्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहे. कोणती पालखी सध्या कुठेय, वाचा!
Palkhi Sohala Pandharpur Aashadhi Wari 2023 (Pratham Gokhale/HT Photo)

Palkhi Sohala Pandharpur : आषाढी वारीसाठी निघालेल्या अनेक पालख्या सध्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहे. कोणती पालखी सध्या कुठेय, वाचा!

    • Palkhi Sohala Pandharpur : आषाढी वारीसाठी निघालेल्या अनेक पालख्या सध्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहे. कोणती पालखी सध्या कुठेय, वाचा!

Palkhi Sohala Pandharpur Aashadhi Wari 2023 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागातून पालख्या पंढरपुरच्या दिशेने रवाना झालेल्या आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत गजानन महाराज यांच्या पालख्या सध्या पंढरपूर आणि सोलापूर शहरांच्या आसपास पोहचल्या आहे. राज्यातील वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले आहे. भक्तिमय वातावरण टाळ आणि मृदुंग वाजवत वारकरी विठुरायाच्या भेटीस निघालेले आहे. येत्या काही दिवसांतच राज्यातील सर्व पालख्या पंढरपुरात एकत्र येणार आहे. त्यानंतर पालखी सोहळा पार पडणार आहे. परंतु आता राज्यातील अनेक भागांतून निघालेल्या पालख्यांचे लाईव्ह अपडेट्स समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज साताऱ्यातील बरड गावात मुक्कामी असणार आहे. त्यामुळं परिसरातील वारकऱ्यांनी गावात मोठी गर्दी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटण दौऱ्यावर आहे. त्यामुळं आज संध्याकाळी ते बरड गावात जाऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. संत तुकाराम महाराजांची पालखीचं रिंगण सोहळा आज इंदापुरात पार पडणार आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि स्थानिक आमदार दत्ता भरणे हे हजेरी लावणार आहे. संत गजानन महाराजांची पालखीचं आज सकाळी नऊ ते दहा वाजता सोलापुरात आगमन होणार आहे. गजानन महाराजांची पालखी उळेगावात मुक्कामी होती.

सोलापुरसह राज्यातील अनेक शहारांमध्ये पालख्यांचं स्वागत शहराचा प्रथम नागरिक अर्थात महापौर किंवा नगराध्यक्ष करत असतो. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने गेल्या दोन वर्षांपासून पालख्यांचं स्वागत स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सोलापूर महापालिकेची निवडणूक लांबल्याने तिथेही प्रशासनाकडूनच पालख्यांचं स्वागत केलं जाणार असल्याची माहिती आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून पंढरपुरात दाखल होत असलेल्या भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. वारकरी मोठ्या भक्तिभावाने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहे.

पुढील बातम्या