मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वसई-विरारमधील रस्त्यांच्या कामांसाठी ६०० कोटी मंजूर, महिनाभरात काम होणार सुरू

वसई-विरारमधील रस्त्यांच्या कामांसाठी ६०० कोटी मंजूर, महिनाभरात काम होणार सुरू

Nov 03, 2023, 10:55 PM IST

  • Nitin Gadkari : वसई विरार महापालिका हद्दीतील रस्ते निर्माणासाठी केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ६०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

Nitin Gadkari

Nitin Gadkari : वसई विरार महापालिका हद्दीतील रस्ते निर्माणासाठी केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ६०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

  • Nitin Gadkari : वसई विरार महापालिका हद्दीतील रस्ते निर्माणासाठी केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ६०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर महापालिका हद्दीतील वाहतुकीचे अनेक प्रश्न मांडत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्याकडून तब्बल ६०० कोटींचा निधी मंजूर करून घेतला. तसंच हे काम एका महिन्यात सुरू होणार आहे. या निधीतून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर ते तलासरी या दरम्यान १२ लेनचा काँक्रिट रस्ता, महापालिका हद्दीत ४० मीटरचा रिंगरस्ता, महामार्गापासून पाच शहरांमध्ये येणाऱ्या रस्त्याचं काँक्रिटीकरण आदी प्रकल्पांचा समावेश आहे. वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी गडकरी वसई-विरारमध्ये आले होते. 

ट्रेंडिंग न्यूज

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

Mumbai Crime News: विरारमध्ये मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणाऱ्या तीन तरुणींना अटक; पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण

Narendra Dabholkar Case : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर अंनिस अन् दाभोलकर कुटुंबियांची भूमिका

Weather Update: मुंबईत ४ ते ५ दिवस अवकाळीची शक्यता; पुणे, संभाजीनगर, सांगली , नगरसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युवा नेते आमदार क्षितीज ठाकूर यांना चर्चेसाठी खास दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले. त्याच वेळी त्यांनी क्षितीज यांच्या शैक्षणिक कर्तृत्वाचीही स्तुती केली. या वेळी आमदार क्षितीज ठाकूर, आमदार राजेश पाटील हे उपस्थित होते.

वसई-विरार महापालिका हद्दीत रस्त्यांची अनेक कामे प्रलंबित होती. ही सर्वच कामे केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने हितेंद्र ठाकूर यांनी सातत्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शुक्रवारी गडकरी वसई-विरारमध्ये आले असता पुन्हा एकदा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी या मागण्यांबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करत त्यांना सखोल माहिती दिली. नितीन गडकरी यांनी आमच्या सर्व मागण्या समजून घेत सकारात्मक भूमिका घेतली आणि तातडीने निधी मंजूर केला, ही वसई-विरारकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया युवा आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केली.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता दहिसर ते तलासरी या टप्प्यात हा मार्ग १२ लेनचा करावा. तसंच ११० किलोमीटरच्या या टप्प्याचं काँक्रिटीकरण करावं, या प्रमुख मागणीसह अनेक प्रकल्पांबाबत हितेंद्र ठाकूर यांनी गडकरी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर नितीन गडकरी यांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या काँक्रिटीकरणासह रूंदीकरण करण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तसंच इतर प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी ठाकूर यांना दिल्लीला येण्याचे निमंत्रणही दिले.

कोणते प्रकल्प होण्याची मागणी?

  •  मुंबई-अहमदाबाद हायवेपासून विरार अर्नाळा, नालासोपारा-निर्मळ, गोखिवरे-नवघर ते वसई गाव, सातिवली ते गोखिवरे, बापाणे-उमेळा-पापडी या महापालिका क्षेत्रांतील प्रमुख शहरांकडे येणाऱ्या पाच मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण
  • वसई-विरार महापालिका क्षेत्रातील चार प्रमुख शहरे जोडणारा ४० मीटर रूंदीचा रिंगरस्ता तयार करणे
  • मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेवरील मनोरजवळील मासवणपासून समृद्धी महामार्गावरील शहापूर तालुक्यातील घोटीपर्यंत ४० मीटर रूंद रस्ता विकसित करणे.
  •  महापालिका क्षेत्रातील पाच रेल्वे ओव्हरब्रीज आणि १२ पादचारी पूल.
  • मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पादचारी पूल आणि अंडरपास.
  • पालघर जिल्ह्यातील कोस्टल रोडमधील प्रमुख ब्रिज उभारणी.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या