मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Train : मुंबईकरांनो इकडं लक्ष द्या! १२ डब्यांच्या 'या' ४९ लोकल उद्यापासून १५ डब्यांसह धावणार

Mumbai Local Train : मुंबईकरांनो इकडं लक्ष द्या! १२ डब्यांच्या 'या' ४९ लोकल उद्यापासून १५ डब्यांसह धावणार

Aug 14, 2023, 07:52 PM IST

  • Mumbai Local Train News : रेल्वे प्रवास सोयीचा आणि आरामशीर व्हावा याकरता रेल्वे प्रशासनाने १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या केल्या आहेत.

Mumbai Local Trains

MumbaiLocalTrain News : रेल्वे प्रवास सोयीचा आणि आरामशीर व्हावा याकरता रेल्वे प्रशासनाने १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या केल्या आहेत.

  • Mumbai Local Train News : रेल्वे प्रवास सोयीचा आणि आरामशीर व्हावा याकरता रेल्वे प्रशासनाने १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या केल्या आहेत.

मुंबईकरांसाठी लोकल सेवा म्हणजे जीवनवाहिनी आहे. लोकलने नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. गर्दीच्या वेळी लोकलला लटकत प्रवास टाळण्यासाठी व  एका लोकल ट्रेनमधून अधिकाधिक प्रवाशांना आरामशीर प्रवास करता यावा, याकरता पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून हा नव्या बदलासह रेल्वे धावणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने उद्यापासून म्हणजे १५ ऑगस्ट २०२३ पासून १२ डब्यांच्या ४९ लोकल ट्रेनचे रुपांतर १५ डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यानचा प्रवास आरामशीर होणार आहे. १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांच्या केल्यानंतर २५ टक्क्यांनी प्रवाशांची क्षमता वाढणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

उपनगरीय वाहतूक सेवा लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मदत मिळणार आहे. ४९लोकल ट्रेन १२ डब्यांवरून १५ डब्यांच्या होणार आहेत. त्यामध्ये मुख्यपणे चर्चगेट ते विरार दरम्यानची स्लो लाइन आणि केवळ १५ फास्ट लाइन सेवांचा समावेश आहे.

१५ डब्यांच्या लोकलसाठी स्टेबलिंग लाइन (पार्किंग सुविधा) विरार, भायंदर आणि अंधेरीमध्ये उपलब्ध आहे. ३ रेक या स्टेशनहून निघेल त्यामध्ये क्रमशः चर्चगेट ते विरार दरम्यान येणाऱ्या-जाणाऱ्या ४९ लोकल गाड्यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितले की, या निर्णयामुळे १५ डब्यांची लोकल ट्रेनची संख्या १५० वरून १९९ होईल.

 

पश्चिम रेल्वे प्रतिदिन ७९ एसी सेवांसोबतच एकूण १,३९४ लोकल सेवांचे संचालन करते. पश्चिम रेल्वे मार्गावर प्रतिदिन २७.२४ लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या