मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  26/11 attack : मुंबई हल्ल्यातील दहशतवादी कसाबला ओळखणारी ती चिमुरडी आता काय करते?

26/11 attack : मुंबई हल्ल्यातील दहशतवादी कसाबला ओळखणारी ती चिमुरडी आता काय करते?

Nov 25, 2023, 07:45 AM IST

  • 26/11 mumbai attack anniversary : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उद्या १४ वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्तानं पुन्हा भयानक आठवणी जाग्या झाल्या आहेत.

26/11 mumbai attack

26/11 mumbai attack anniversary : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उद्या १४ वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्तानं पुन्हा भयानक आठवणी जाग्या झाल्या आहेत.

  • 26/11 mumbai attack anniversary : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उद्या १४ वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्तानं पुन्हा भयानक आठवणी जाग्या झाल्या आहेत.

Devika Rotawan on 26/11 mumbai attack : भारतासह जगाला हादरवून टाकणाऱ्या २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याला उद्या १४ वर्षे होत आहेत. इतक्या वर्षांनंतरही या हल्ल्याच्या भयानक आठवणी विसरता येत नाहीत. दरवर्षी २६ नोव्हेंबरला हा हल्ला आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींची चर्चा होत असते.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब हा जिवंत पकडला गेला होता. पुढं त्याच्यावर खटला चालला. या खटल्यात महत्त्वाचा दुवा ठरलेली आणि कसाबला ओळखणारी तेव्हाची चिमुरडी देविका रोटावन आता २४ वर्षांची झाली आहे. आज या घटनेला १४ वर्षे उलटल्याच्या पार्श्वभूमीवर देविका नेमकी कुठं आहे, ती काय करते आणि तिला दिलेल्या आश्वासनांचं काय झालं हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल.

'मुंबईवर हल्ला झाला तेव्हा देविका अवघ्या ९ वर्षांची होती. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ती वडिलांसोबत ट्रेनची वाट बघत थांबली होती. त्याचवेळी बेछूट गोळीबार झाला आणि एक गोळी तिच्याही पायाला लागली. तो दिवस आजही तिला स्पष्ट आठवतो.

मोठी बातमी ! मुंबईत ४ डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू, नेमकं कारण काय?

‘तो दिवस आठवण्यासाठी मला नोव्हेंबर महिन्याच्या २६ तारखेची गरज नाही, असं ती 'इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हणाली. आजारपणामुळं शिक्षणाची अनेक वर्षे वाया गेलेली देविका सध्या वांद्रे येथील चेतना कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) च्या शेवटच्या वर्षाला आहे. ती आता नोकरीच्या शोधात आहे. अनेक आश्वासनं दिली गेली. मात्र, शेवटी तुम्हाला स्वत:लाच स्वत:चा मार्ग शोधावा लागतो, असं ती म्हणते.

देविकाला आयपीएस व्हायचंय!

'देविकाला अजूनही अधूनमधून पायात वेदना होतात. कधी-कधी त्या रात्री सारखा त्रास होऊ लागतो. दहशतवाद संपवण्यासाठी आयपीएस अधिकारी बनण्याचा संकल्प तिनं त्यावेळी केला होता. पण आयुष्य आपल्या गतीनं पुढं सरकत गेलं. असं असलं तरी देविका तिच्या निश्चयावर ठाम आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेन. सध्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी नोकरीच्या शोधात आहे, असं ती म्हणते.

'खूप मोठमोठ्या गोष्टी बोलत असल्याबद्दल लोक माझी खिल्ली उडवतील. पण एवढ्या वर्षात मी जे भोगलंय, ते माझं मला माहीत आहे. जगण्याच्या संघर्षात मला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी वेळच मिळाला नाही, असं ती म्हणाली.

मोठी बातमी..! कोविड ऑक्सिजन प्लँट फसवणूक प्रकरणात BMC कंत्राटदार रोमिन छेडाला अटक

२६/११ च्या हल्ल्यात जखमी झालेली देविका त्यातून बरी झाल्यानंतर तिला टीबीनं गाठलं आणि पुन्हा रुग्णालयात जावं लागलं. एका दहशतवाद्याला पाहिलेल्या ११ वर्षांच्या मुलीचं आयुष्य इतरांसारखं सहज नव्हतं. तिच्यावर सहा शस्त्रक्रिया आधीच झाल्या होत्या. पायात गोळी घुसलेली असताना कसाबवर पडलेली तिची नजर, न्यायालयात कसाबला ओळखण्याचा प्रसंग हे सगळं ती सहज सांगून जाते. मात्र, तिचे छंद आणि आवडीनिवडी सांगताना ती गडबडते.

२६/११ चा खटला सुरू असताना रोटावन कुटुंब वांद्रे झोपडपट्टीतील एका चाळीतून सांताक्रूझमधील एका वन बीचके फ्लॅटमध्ये स्थलांतरित झालं. हे घर त्यांनी भाड्यानं घेतलं होतं. देविकाचा दिव्यांग भाऊ एका स्टेशनरीच्या दुकानात काम करतो आणि घर चालवतो. तिच्या वडिलांचं वय झालं असून ते आजारपणानं त्रस्त आहेत. आता मला कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे, असं ती म्हणते.

कसाबला फासावर लटकवायला उशीर होत असल्यानं तिची त्यावेळी चिडचिड व्हायची. आम्ही जगण्यासाठी संघर्ष करत असताना तो तुरुंगात मजा मारतोय हे समजल्यावर तिला संताप यायचा. 'आम्ही कसाबला ओळखतो हे समजल्यावर आमच्याकडं बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला. आमच्या जिवाला धोका असू शकतो याची जाणीव होऊन लोक आमच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करायचे. घर घेणं, शाळा शोधणं आणि नातेवाईकांकडून मदतीची अपेक्षा करणंही कठीण होतं, अशी वेदना ती बोलून दाखवते.

मास्टरमाइंड कुठे आहेत?

'कसाबला जिवंत पकडणं आणि त्याची ओळख पटणं किती महत्त्वाचं होतं हे आता मला समजतंय. मात्र, अजूनही धोका टळलेला नाही. कारण, कसाब हा एक बाहुलं होता. त्याच्या सूत्रधारांना शोधण्यासाठी आपण काय करतोय. जोपर्यंत त्याचा समूळ नायनाट होत नाही, तोपर्यंत दहशतवादी हल्ला होणार नाहीत याची गॅरंटी नाही, अशी भीती देखील देविका व्यक्त करते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या