मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  SaifAli Khan: "तैमूरचे नाव राम ठेवले नाही कारण…" विक्रम वेधच्या रिलीजपूर्वी सैफचा व्हिडीओ व्हायरल

SaifAli Khan: "तैमूरचे नाव राम ठेवले नाही कारण…" विक्रम वेधच्या रिलीजपूर्वी सैफचा व्हिडीओ व्हायरल

Sep 27, 2022, 12:49 PM IST

    • Vikram Vedha Boycott: सैफ अली खान आणि हृतिक रोशनचा आगामी चित्रपट विक्रम वेधावर बहिष्कार टाकावा असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाला आहे.
विक्रम वेध

Vikram Vedha Boycott: सैफ अली खान आणि हृतिक रोशनचा आगामी चित्रपट विक्रम वेधावर बहिष्कार टाकावा असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाला आहे.

    • Vikram Vedha Boycott: सैफ अली खान आणि हृतिक रोशनचा आगामी चित्रपट विक्रम वेधावर बहिष्कार टाकावा असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाला आहे.

सैफ अली खान आणि हृतिक रोशन स्टारर विक्रम वेधा ३० सप्टेंबरला रिलीज होत आहे. यापूर्वीच सोशल मीडियावर या सिनेमावर बहिष्कार टाकावा असा ट्रेंड सुरु झाला आहे. लोकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची अनेक कारणे शोधली आहेत. लोक सैफचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत आहेत, ज्यामध्ये तो त्याच्या मुलाच्या नावाबद्दल बोलत आहे. यासोबतच लोक सैफ आणि हृतिक या दोघांना घराणेशाहीचे उत्पादन म्हणत चित्रपटाला ट्रोल करत आहेत. याशिवाय साऊथ चित्रपटाचा रिमेक बनवण्यावरही काही लोकांची नाराजी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर

मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या", सुबोध भावेचे प्रेक्षकांना आवाहान

करिनामुळे सैफवर नाराजी?

गेल्या काही बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच हृतिक आणि सैफचा आगामी चित्रपट विक्रम वेध या चित्रपटावरही बहिष्कार टाकण्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खान या दोघांच्या जुन्या विधानांमुळे लोक चित्रपटाला विरोध करत आहेत. सैफ करीना कपूरचा नवरा आहे म्हणूनही लोकांनी चित्रपट न पाहण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी सैफचा एक जुना व्हिडीओही व्हायरल होत आहे. यामध्ये सैफ आपल्या मुलाचे नाव सिकंदर किंवा राम ठेवू शकत नसल्याचे सांगत आहे.

नक्की काय म्हणाला सैफ?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सैफ म्हणतोय, मला आंतरराष्ट्रीय नाव हवे होते. मला असेही सांगण्यात आले की जगात काही प्रमाणात इस्लामोफोबिया आहे. मी माझ्या मुलाचे नाव सिकंदर किंवा राम ठेवू शकलो नाही. तेव्हा विचार केला की चांगले मुस्लिम नाव का ठेवू नये. मी त्याला धर्मनिरपेक्ष मूल्यांसह वाढवण्याची आशा करतो जेणेकरून ते एकमेकांचा आदर करतील.

बघा व्हायरल व्हिडीओ:

दोघ नेपोटिझम प्रोडक्ट

सैफच्या या व्हिडीओला विरोध केला जात आहे. त्याचवेळी काही लोकांनी हृतिक रोशनने लाल सिंग चड्डाला पाठिंबा दिल्याचे लिहिले आहे. त्याचबरोबर सैफ आणि हृतिक दोघांनाही घराणेशाहीचे उत्पादन म्हणत विरोध केला जात आहे.

पुढील बातम्या