मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urofi Javed: इंस्टाग्रामने उर्फी जावेदला दिला झटका; अभिनेत्रीचं अकाऊंट झालं निलंबित! कारण काय?

Urofi Javed: इंस्टाग्रामने उर्फी जावेदला दिला झटका; अभिनेत्रीचं अकाऊंट झालं निलंबित! कारण काय?

Dec 03, 2023, 03:52 PM IST

  • Urofi Javed Instagram Account Suspend: उर्फीने स्वतः एक स्क्रीनशॉट शेअर करून आपलं अकाऊंट सस्पेंड झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

Urofi Javed Instagram Account Suspend

Urofi Javed Instagram Account Suspend: उर्फीने स्वतः एक स्क्रीनशॉट शेअर करून आपलं अकाऊंट सस्पेंड झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

  • Urofi Javed Instagram Account Suspend: उर्फीने स्वतः एक स्क्रीनशॉट शेअर करून आपलं अकाऊंट सस्पेंड झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

Urofi Javed Instagram Account Suspend: आपल्या चित्रविचित्र फॅशनने सगळ्यांनाच चकित करणारी उर्फी जावेद नेहमीच चर्चेत चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून उर्फी जावेद आपल्या फॅशनचा जलवा दाखवत असते. मात्र, आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने उर्फी जावेद हिला मोठा धक्का दिला आहे. अभिनेत्रीचं सोशल मीडिया अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. उर्फीने सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट शेअर करून याची माहिती चाहत्यांना दिली आहे. उर्फीचा हा स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत...

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

उर्फीने स्वतः एक स्क्रीनशॉट शेअर करून आपलं अकाऊंट सस्पेंड झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. मात्र, आता उर्फीने तिचं अकाऊंट रिकव्हर करून घेतलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा उर्फीचं अकाऊंट दिसू लागलं आहे. उर्फीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये मेटाचे अनेक निर्बंध आणि नियम दिसत आहेत. याच स्क्रिनशॉटमध्ये लिहिण्यात आले आहे की, कम्युनिटी गाईडलाईनचे पालन न केल्यामुळे उर्फी जावेद हिचे अकाऊंट बंद करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.

उर्फी जावेद हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही लोकांना उर्फी जावेद हिची फॅशन सेन्स आवडते. तर, काही लोक तिला तिच्या याच फॅशन सेन्समुळे ट्रोलही करतात. अशा चित्रविचित्र फॅशनमुळे अनेकदा तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळत असतात. मात्र, उर्फीला अशा धमक्यांमुळे आता काहीही फरक पडत नाही. ती बेधडकपणे प्रत्येक ट्रोलरला उत्तर देताना दिसते.

विभाग

पुढील बातम्या