मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: उर्फी जावेदच्या हातात पडल्या बेड्या? सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल!

Urfi Javed: उर्फी जावेदच्या हातात पडल्या बेड्या? सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल!

Jan 07, 2023, 12:13 PM IST

    • Urfi Javed in Handcuffs: 'तुम्हा सर्वांना मला बेड्यांमध्ये पाहायचे होते ना? बरोबर? तुमची इच्छा मीच पूर्ण केली’, असे म्हणत उर्फीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
urfi javed

Urfi Javed in Handcuffs: 'तुम्हा सर्वांना मला बेड्यांमध्ये पाहायचे होते ना? बरोबर? तुमची इच्छा मीच पूर्ण केली’, असे म्हणत उर्फीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

    • Urfi Javed in Handcuffs: 'तुम्हा सर्वांना मला बेड्यांमध्ये पाहायचे होते ना? बरोबर? तुमची इच्छा मीच पूर्ण केली’, असे म्हणत उर्फीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Urfi Javed in Handcuffs: अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे आता अनेकांच्या निशाण्यावर आली आहे. मात्र, उर्फी प्रत्येकालाच आपल्या हटके अंदाजात उत्तर देत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक महिला नेत्यांनी देखील उर्फीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला अटक करण्याची देखील मागणी केली होती. यावर आता उर्फी जावेद हिने एक व्हिडीओ शेअर करून सगळ्यांची बोलतीच बंद केली आहे. उर्फीने नेहमीप्रमाणे आपल्याच हटके अंदाजात उत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

उर्फी जावेद हिने सोशल मीडिया अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद एका अतिशय बोल्ड आऊटफिटमध्ये दिसत आहे. यया व्हिडीओमध्ये काळ्या रंगाची बिकिनी परिधान करून उर्फीने स्वतःच्या हातात बेड्या देखील अडकवल्या आहेत. या व्हिडीओत ती हातात बेड्या घालून मादक हावभाव करताना दिसत आहे. उर्फीने या व्हिडीओला हटके कॅप्शन देखील दिलं आहे. तिने या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'तुम्हा सर्वांना मला बेड्यांमध्ये पाहायचे होते ना? बरोबर? तुमची इच्छा मीच पूर्ण केली.'

उर्फीचा हा मजेशीर अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. अनेकांनी कमेंट्स करत उर्फीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. एका चाहत्याने लिहिले की, ‘उर्फी तू खूपच हॉट दिसत आहेत. तू आहेस तशीच राहा. या जगासाठी तू स्वतःला बदलू नकोस. तुझ्यासाठी हे जग बदलू दे. मी नेहमी तुझ्यासोबत आहे.’ तर, एका चाहत्याने लिहिले की, ‘तू काय भारी उत्तर दिलं आहेस.’

काही लोक तिच्या या व्हिडीओवर टीका देखील करत आहेत. एका युझरने लिहिले की, ‘आम्ही तुझ्या विरोधात नाही. पण सतत हे असे अर्धनग्न कपडे घालून व्हिडीओ शेअर करणं बरोबर नाही.’ तर, एका युझरने लिहिले की, ‘हिला काहीही बोलून फायदा नाही. कारण स्वतःला हवं ते करणारच हा निश्चय तिने केला आहे.’ तर, एका युझरने लिहिले की, ‘खरंच आम्हाला तुला तुरुंगात पाहायचे आहे. आमची ही इच्छा देखील पूर्ण होऊ दे.’

पुढील बातम्या