मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  National Farmer's Day: शेतकऱ्यांचे कठोर परिश्रम आणि निस्वार्थ स्वभावाला ‘फिल्म’द्वारे प्रणाम

National Farmer's Day: शेतकऱ्यांचे कठोर परिश्रम आणि निस्वार्थ स्वभावाला ‘फिल्म’द्वारे प्रणाम

HT Marathi Desk HT Marathi

Dec 23, 2023, 02:43 PM IST

    • National Farmers Day - कृषी क्षेत्रात नवनवीन गोष्टी आणून आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचे ध्येय ठेवून राष्ट्रीय किसान दिन साजरा केला जातो.
Shortfilm on National Farmers day

National Farmers Day - कृषी क्षेत्रात नवनवीन गोष्टी आणून आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचे ध्येय ठेवून राष्ट्रीय किसान दिन साजरा केला जातो.

    • National Farmers Day - कृषी क्षेत्रात नवनवीन गोष्टी आणून आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचे ध्येय ठेवून राष्ट्रीय किसान दिन साजरा केला जातो.

दरवर्षी २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिवस (National Farmer's Day) साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जंयतीनिमित्त राष्ट्रीय किसान दिवस साजरा केला जातो. या दिवशी कृषी क्षेत्रात नवनवीन गोष्टी आणून आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचे ध्येय्य हा दिवसा साजरा करण्यामागे असतो. आजच्या किसान दिनाचे औचित्य साधून गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट कंपनीने ‘किसान से हम है’ नावाची एक ब्रँड फिल्म रिलीज प्रदर्शित केली आहे. देशातील नागरिकांचे पोट भरण्यामध्ये देशातील शेतकऱ्यांची अविभाज्य भूमिका असते. शेतात अहोरात्र राबून नागरिकांची अन्नाची भूक भागविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘किसान से हम है’ हा लघुपट तयार करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

‘मंजू माई’ निघाली कान्सला! मराठी चित्रपट ते थेट कान फिल्म फेस्टिव्हलचा प्रवास करणारी छाया कदम!

हा लघुपट बनवण्यामागचे उद्देश्य सांगताना गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव म्हणाले, ‘हा लघुपट म्हणजे देशभरात कठोर परिश्रम करणारे शेतकरी आणि त्यांचा निस्वार्थी स्वभाव याला एकप्रकारे प्रामाणिक पोच पावती आहे. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांचे कल्याण करणे हे केवळ आपले ध्येय नसून जबाबदारी सुद्धा आहे.’

गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक बुर्जिस गोदरेज म्हणाले, ‘गोदरेज समूह १९९१ पासून सातत्याने थेट शेतकऱ्यांसोबत मिळून काम करत असून त्यांना कृषी क्षेत्रातलं नवनवीन ज्ञान, उत्कृष्ट आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीमालाला चांगले भाव मिळावे यासाठी मदत केली जाते. शेतीची उत्पादकता सुधारून जेणेकरून देशाला अन्न पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’ असं गोदरेज म्हणाले. या लघुपटात पीक संरक्षण व्यवसाय विभागाचे सीईओ राजावेलू एन.के.यांनी मत मांडले आहे. समृद्ध भारत बनवण्यासाठी आणि सोबतच शेतकरी कुटुंबांची उन्नती करण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पेरलेले प्रत्येक बियाणे कसे उपयोगी होईल याची खात्री देत असल्याचं मत राजावेलू यांनी मांडले.

अ‍ॅनिमल फीड बिझनेसचे सीईओ संदीप कुमार सिंग, गोदरेज जर्सीचे सीईओ भूपेंद्र सुरी, सौगता नियोगी, सीईओ, ऑइल पाम बिझनेस यांनीही या लघुपटात राष्ट्रीय किसान दिनानिमित्त मते मांडली आहेत.

या लघुपटाची निर्मिती गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि क्रिएटिव्ह लँड एशिया यांच्या सहयोगाने करण्यात आली आहे.  

पुढील बातम्या