मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Athang: क्रूरपणाची सीमा नसते यांचे उदाहरण म्हणजे हा वाडा; 'अथांग'चा ट्रेलर चर्चेत

Athang: क्रूरपणाची सीमा नसते यांचे उदाहरण म्हणजे हा वाडा; 'अथांग'चा ट्रेलर चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 22, 2022, 01:38 PM IST

    • Athang Trailer: ‘अथांग’ ही सहा भागांची सीरिज २५ नोव्हेंबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे
अथांग ट्रेलर (HT)

Athang Trailer: ‘अथांग’ ही सहा भागांची सीरिज २५ नोव्हेंबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे

    • Athang Trailer: ‘अथांग’ ही सहा भागांची सीरिज २५ नोव्हेंबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे

सध्या सर्वत्र 'अथांग' या मराठी वेब सीरिची चर्चा रंगली आहे. या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये ट्रेलरबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. आता या सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. ‘अथांग’ ही सहा भागांची सीरिज असणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

अथांग सीरिजच्या २ मिनिटे २५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये निसर्गयरम्य कोकण, तिथला रहस्यमय वाडा आणि त्या वाड्यात दडलेली अनेक गुपितं आणि यात आणखी उत्कंठा वाढवणारा शेवटचा प्रश्न. ट्रेलरच्या शेवटी एक लहान मुलगा, ''आई अळवत म्हणजे काय?" असा प्रश्न विचारतो. आता सरदेशमुखांच्या कुटुंबाचा आणि त्या अळवतीचा काय संबंध, हे 'अथांग' पाहिल्यावरच उलगडेल.
वाचा: 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याने केले अनुषा शेट्टीशी लग्न Video Viral

अथांग या वेबसीरिजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर हे निर्माते आहेत. थरार, रहस्याने भरलेली ही सहा भागांची वेबसीरिज येत्या २५ नोव्हेंबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

पुढील बातम्या