मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Blurr Teaser: सस्पेन्स अन् थ्रिलरचा डबल डोस; तापसी पन्नूच्या ‘ब्लर’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Blurr Teaser: सस्पेन्स अन् थ्रिलरचा डबल डोस; तापसी पन्नूच्या ‘ब्लर’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Nov 27, 2022, 08:54 AM IST

    • Blurr Teaser: ‘शाबास मिठू’ आणि ‘दो बारा’ या चित्रपटांनंतर आता तापसी पन्नू ‘ब्लर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Taapsee Pannu

Blurr Teaser: ‘शाबास मिठू’ आणि ‘दो बारा’ या चित्रपटांनंतर आता तापसी पन्नू ‘ब्लर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    • Blurr Teaser: ‘शाबास मिठू’ आणि ‘दो बारा’ या चित्रपटांनंतर आता तापसी पन्नू ‘ब्लर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Blurr Teaser: अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या ‘ब्लर’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात तापसी पुन्हा एकदा हटके भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. यंदाचं वर्ष तापसी पन्नूसाठी म्हणावं तितकं खास नव्हतं. या वर्षी तपासीचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र, दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकले नाहीत. मात्र, तिच्या नव्या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

‘शाबास मिठू’ आणि ‘दो बारा’ या चित्रपटांनंतर आता तापसी पन्नू ‘ब्लर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, यावेळी तापसी पन्नूचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नसून, ओटीटीवर रिलीज करण्यात करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता चित्रपटाचा टीझर देखील रिलीज करण्यात आला आहे. या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

तापसी पन्नूचा हा आगामी चित्रपट ‘ब्लर’ हा मर्डर मिस्ट्री असणार आहे. या टीझरची सुरुवात एका ब्लर सीनने होते. या दृश्यात सगळं काही ब्लर दिसू लागतं. यानंतर अचानक एक फोन वाजतो आणि तापसी पन्नूचा आवाज ऐकू येतो. फोनवरील व्यक्ती बोलत नसल्याचे पाहून तापसी प्रचंड वैतागते आणि एक शिवी हासडून फोन ठेवून देते. यानंतर शेवटी तापसी पन्नूची किंकाळी ऐकू येते, असा हा टीझर अंगावर शहारे आणतो. सस्पेन्स आणि थ्रिलरचा डबल डोस असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

‘ब्लर’ या चित्रपटात तापसी पन्नू ‘गायत्री’ हे पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची कथा ‘गायत्री नावाच्या महिलेच्या आयुष्याभोवती फिरताना दिसणार आहे. अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर, या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा देखील तापसी पन्नू सांभाळणार आहे. ‘ब्लर’ हा चित्रपट येत्या ९ डिसेंबरला ‘झी ५’वर रिलीज होणार आहे.

विभाग

पुढील बातम्या