मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Taapsee Pannu: राजू श्रीवास्तव यांच्याविषयी विचारताच संतापली तापसी पन्नू, व्हिडीओ व्हायरल

Taapsee Pannu: राजू श्रीवास्तव यांच्याविषयी विचारताच संतापली तापसी पन्नू, व्हिडीओ व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 22, 2022, 10:49 AM IST

    • Raju Srivastava Death: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला राजू श्रीवास्तव यांच्याविषयी विचारताच संताप व्यक्त केला आहे.
तापसी पन्नू (HT)

Raju Srivastava Death: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला राजू श्रीवास्तव यांच्याविषयी विचारताच संताप व्यक्त केला आहे.

    • Raju Srivastava Death: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला राजू श्रीवास्तव यांच्याविषयी विचारताच संताप व्यक्त केला आहे.

अतिशय लोकप्रिय कॉमेडियन, अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे २१ ऑगस्ट रोजी निधन झाले आहे. ११ ऑगस्ट रोजी हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांना दिल्लीमधील सरकारी रुग्णालय एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला राजू श्रीवास्तव यांच्याविषयी विचारताच संताप व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

तापसीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती फोटोग्राफरवर संतापली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तापसीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फोटोग्राफरने तिचा रस्ता ब्लॉक केला आहे. दरम्यान, फोटोग्राफर तिला राजू श्रीवास्तव यांच्या निधनाविषयी प्रश्न विचारतात. पण रस्ता ब्लॉक केला असल्यामुळे तापसी संताप व्यक्त करते आणि जास्त काही न बोलता तेथून निघून जाते आहे.
वाचा: "आमिरच्या घरात मला कैद करून ठेवलेलं", फैजलचा धक्कादायक खुलासा

'अरे भाऊ, थोडा बाजूला हो, मागे जा. तुम्ही सगळे मागे व्हा. असे काही करु नका. मी काय बोलू त्यांच्या निधनावर. तुम्ही मागे जा' असे तापसी फोटोग्राफर्सला बोलते. सध्या सोशल मीडियावर तापसीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

तापसीच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'तिची सेक्यूरिटी कुठे आहे? ती गरीब मुलगी तिची सेक्यूरिटी सांभाळते' अशी कमेंट केली होती. दुसऱ्या एका व्यक्तीने 'ती महिला घाबरली आहे' असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर तापसीचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

विभाग

पुढील बातम्या