मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Taapsee Pannu Birthday: तापसीने कोणत्याही अभिनेत्याला डेट केले नाही, काय आहे कारण?

Taapsee Pannu Birthday: तापसीने कोणत्याही अभिनेत्याला डेट केले नाही, काय आहे कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 01, 2023, 09:13 AM IST

    • Taapsee Pannu Birthday: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नूचा आज १ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
Taapsee Pannu (HT_PRINT)

Taapsee Pannu Birthday: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नूचा आज १ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

    • Taapsee Pannu Birthday: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नूचा आज १ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

कोणताही गॉडफादर नसताना बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तापसी तिच्या अभिनयासोबतच तिच्या बेधडक वक्तव्यासाठी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. कोणतंही वक्तव्य करताना ती मागे पुढे पाहत नाही. चित्रपट असो किंवा वैयक्तिक आयुष्य ती नेहमीच खंबीरपणे तिची भूमिका मांडताना दिसली आहे. आज १ ऑगस्ट रोजी तापसी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. परंतु, आपल्या एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये तिने एकाही बॉलिवूड अभिनेत्याला डेट केलं नाही. यामागील कारणही तिने स्पष्ट केलं होतं. एका अभिनेत्री आणि अभिनेत्यामधलं नातं फारसं टिकू शकत नाही, असं तिने म्हटलं होतं.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

काही वर्षांपूर्वी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत तापसी म्हणाली होती, 'मला वाटतं की एका नात्यामध्ये एकच कलाकार असू शकतो. मी हे फक्त माझ्याबद्दल बोलतेय. मला हे मुळीच आवडणार नाही की मी सेटवर माझ्या चित्रपटाबद्दल बोलतेय आणि पुन्हा घरी जाऊनसुद्धा चित्रपटाबद्दलच बोलतेय. मला माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात एक सीमारेषा घालणं आवश्यक आहे. या दोघांची सांगड घालणं गरजेचं आहे. त्यांना एकत्र करून चालणार नाही. मला कामाशिवायही काही वेगळं आयुष्य आहे. मला वाटतं तुमचं करिअर हे तुमच्या आयुष्याचा एक भाग असतं. आणि अशा खूप गोष्टी असतात ज्यामुळे तुमचं आयुष्य बनतं.'

आणखी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आपले विचार सांगत ती म्हणाली होती, ‘ मी याबाबतीत क्लिअर आहे की एका नात्यामध्ये एकच व्यक्ती सुपरस्टार असू शकते. आणि आमच्या नात्यात ती मी असेन. मला वैयक्तिक पातळीवर असं वाटतं की अभिनेता आणि अभिनेत्रीमधलं हे नातं फार काळ टिकू शकत नाही.’

विभाग

पुढील बातम्या