मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Swara Bhaskar: गांधी हम शर्मिंदा है... अभिनेत्री स्वरा भास्करनं केलेलं ट्वीट चर्चेत

Swara Bhaskar: गांधी हम शर्मिंदा है... अभिनेत्री स्वरा भास्करनं केलेलं ट्वीट चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 30, 2023, 03:07 PM IST

    • Mahatma Gandhi Death Anniversary: आज ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते. त्यानिमित्ताने अनेक कलाकार हे सोशल मीडियावर ट्वीट करताना दिसतायेत. अभिनेत्री स्वरा भास्करने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
स्वरा भास्कर (HT)

Mahatma Gandhi Death Anniversary: आज ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते. त्यानिमित्ताने अनेक कलाकार हे सोशल मीडियावर ट्वीट करताना दिसतायेत. अभिनेत्री स्वरा भास्करने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

    • Mahatma Gandhi Death Anniversary: आज ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते. त्यानिमित्ताने अनेक कलाकार हे सोशल मीडियावर ट्वीट करताना दिसतायेत. अभिनेत्री स्वरा भास्करने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बॉलिवूडमधील अतिशय बिनधास्त अभिनेत्री म्हणून स्वरा भास्कर ओळखली जाते. चित्रपटातील तिच्या भूमिकांपेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायमच स्वरा चर्चेत असते. ती सतत सामाजिक विषयांवर बेधडकपणे तिचे मत मांडताना दिसते. अनेकदा तिला सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण स्वरा त्याकडे फारसे लक्ष देत नाही. सध्या सोशल मीडियावर स्वराने केले ट्वीट चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

स्वराने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त ट्वीट केले आहे. आज महात्मा गांधी अर्थात मोहनदास करमचंद गांधी यांची आज ७५वी पुण्यतिथी आहे. हा दिवस महात्मा गांधींच्या अहिंसेच्या शिकवणीसाठी विशेष ओळखला जातो. त्यानिमित्ताने स्वरा भास्करने ट्विटर अकाऊंटवर 'गाँधी हम शर्मिन्दा हैं, तेरे क़ातिल ज़िंदा हैं।' असे ट्वीट केले आहे. तिच्या या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वाचा: अति घाई संकटात नेई; 'दीपा'ने सांगितला रेल्वे स्टेशनवरील किस्सा

हिंसेपेक्षा अहिंसा हे एक सर्वात मोठं शस्त्र आहे आणि त्या शस्त्राच्या आधारे मोठमोठी युद्ध बंदुकीशिवाय जिंकता येतात हे महात्मा गांधींनी जगाला पटवून दिलं. महात्मा गांधींना कोणी बापू म्हणूनही हाक मारतात. सत्य आणि अहिंसेचा मार्ग सर्वात सुंदर आणि खरा मार्ग आहे याची शिकवण महात्मा गांधी यांनी करुन दिली. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींनी राष्ट्रपिता या उपाधीने गौरवण्यात आलं. गांधीजींच्या प्रयत्नांनी देश १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र झाला. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर काहीच दिवसात ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले. गांधीजींना नथुराम गोडसेने बिर्ला हाऊसमधील गांधी स्मृती येथे संध्याकाळी प्रार्थनेदरम्यान गोळ्या घातल्या. हा दिवस गांधीजींची पुण्यतिथी म्हणून इतिहासात कायमचा नोंदवला गेला.

विभाग

पुढील बातम्या