मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Swara Bhaskar : लग्न करताच स्वरानं फहादसाठी केलेले जुने ट्वीट चर्चेत, 'भाईचा आत्मविश्वास...'

Swara Bhaskar : लग्न करताच स्वरानं फहादसाठी केलेले जुने ट्वीट चर्चेत, 'भाईचा आत्मविश्वास...'

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 17, 2023, 09:43 AM IST

  • Swara Bhaskar Wedding: स्वराने काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये फहादचा उल्लेख भाऊ म्हणून केला होता. आता लग्नानंतर तिचे ट्वीट व्हायरल झाले आहे.

स्वरा भास्कर (HT)

Swara Bhaskar Wedding: स्वराने काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये फहादचा उल्लेख भाऊ म्हणून केला होता. आता लग्नानंतर तिचे ट्वीट व्हायरल झाले आहे.

  • Swara Bhaskar Wedding: स्वराने काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये फहादचा उल्लेख भाऊ म्हणून केला होता. आता लग्नानंतर तिचे ट्वीट व्हायरल झाले आहे.

देशातील सामाजिक व राजकीय घडामोडींवरील रोखठोक भूमिका आणि बेधडक मतांमुळे अभिनेत्री स्वरा भास्कर कायम चर्चेत असते. अनेकदा तिला या सर्वामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. आता स्वराने सोशल मीडियावर लग्न केल्याचा फोटो शेअर करत चाहत्यांना धक्काच दिला आहे. त्यानंतर लगेच स्वराचे जुने ट्वीट व्हायरल झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

स्वराने समाजवादी पक्षाचा एक कार्यकर्ता फहाद अहमद याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लग्न केल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी जुने ट्वीट काढून स्वराला पुन्हा ट्रोल केले आहे. यापूर्वी स्वराने केलेल्या एका ट्वीटमध्ये फहादचा 'भाऊ' म्हणून उल्लेख केला होता.

'फ़हाद मियाँ तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! भाईचा आत्मविश्वास असाच कायम राहू दे. खुश रहो, आबाद रहो.. वय होत चालले आहे आता लग्न करुन टाक. तुझा वाढदिवस आणि तुझे हे सर्व उत्तम जावे' असे तिने ट्वीटमध्ये म्हटले होते. ज्या फहादचा स्वराने ट्वीटमध्ये भाऊ असा उल्लेख केला आहे. आता त्याच्याशीच लग्न केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

काय आहे स्वराने लग्नानंतरचे ट्वीट?

अनेकदा आपल्या जवळ किंवा अगदी सोबत असलेली गोष्ट आपण दूरवर कुठंतरी शोधत असतो. आम्ही देखील अशाच शोधात होतो, प्रेमाच्या. आधी आम्हाला आमच्यातली मैत्री गवसली आणि त्यातून मग आम्ही दोघे एकमेकांना सापडलो, असं तिनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. '@FahadZirarAhmad मी अंत:करणपूर्वक तुझं स्वागत करते. माझं हृदय सध्या गोंधळलेलं आहे, पण कसंही असलं तरी ते तुझं आहे, असंही स्वरानं फहादला टॅग करून म्हटलं आहे.

कोण आहे फहाद अहमद?

फहाद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा राज्याचा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता आहे. २०२० साली झालेल्या एका आंदोलनाच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती.

विभाग

पुढील बातम्या