मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suniel Shetty: ‘मी देखील याचा सामना केलाय...’; नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर सुनील शेट्टी मनातलं बोलला!

Suniel Shetty: ‘मी देखील याचा सामना केलाय...’; नितीन देसाईंच्या मृत्यूनंतर सुनील शेट्टी मनातलं बोलला!

Aug 07, 2023, 12:02 PM IST

  • Suniel Shetty: काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपलं आयुष्य संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला होता. यावर आता सुनील शेट्टी याने प्रतिक्रिया दिली आहे.

Suniel Shetty-Nitin Desai

Suniel Shetty: काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपलं आयुष्य संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला होता. यावर आता सुनील शेट्टी याने प्रतिक्रिया दिली आहे.

  • Suniel Shetty: काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपलं आयुष्य संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला होता. यावर आता सुनील शेट्टी याने प्रतिक्रिया दिली आहे.

Suniel Shetty On Nitin Desai: झगमगाटी विश्व हे केवळ बाहेरून सुंदर दिसतंय. मात्र, त्यात वावरत असलेल्या प्रत्येकालाच कधीना कधी नैराश्याचा सामना करावा लागला आहे. या नैराश्याच्या गर्तेत अनेकांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. तर, काहींनी मात्र आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलून यातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. काहीच दिवसांपूर्वी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपलं आयुष्य संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला होता. यानंतर आता अभिनेता सुनील शेट्टी याने देखील यावर प्रतिक्रिया देत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

ओटीटीवर पुन्हा 'स्कॅम' होणार! १९९२मध्ये हर्षद मेहता, २००३मध्ये तेलगी; आता २०१०च्या घोटाळ्याची फाईल उघडणार!

अभिनयच नव्हे, तर अभिनेता सुनील शेट्टी अनेक सामाजिक कार्यात आवर्जून सहभागी होत असतो. एका मानसिक आरोग्याविषयी माहिती देणाऱ्या अॅपचे लाँचिंग करण्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी देखील उपस्थित होता. यावेळी त्याने आपल्या आयुष्यातील वाईट टप्प्याबद्दल खुलेपणाने सांगितले. यासोबतच सुनीलने कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनावर देखील शोक व्यक्त केला आहे. यावेळी त्याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचीही आठवण काढली.

Aditya Kadam: नाटक, एकांकिकेनंतर आदित्य कदम गाजवणार मोठा पडदा! थरारक भूमिकेतून करणार मनोरंजन

यावेळी मानसिक आरोग्याविषयी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, ‘मी स्वतः बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. मी मानसिक ताण चांगल्या प्रकारे हाताळला आहे. मी अनेकदा अपयश देखील पाहिले आहे. याचा अर्थ असा नाही की, मला ताण नाही. आम्ही सगळेच तणावग्रस्त आहोत. माणूस म्हणून आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपण सगळेच याचा सामना करत आहोत. आपण आपल्या समस्यांबद्दल जवळच्या मित्रांशी बोलले पाहिजे. कदाचित ते तुम्हाला अधिक चांगली मदत करू शकतात. आधी तणावातून बाहेर पडा आणि तुम्हाला कशाचा त्रास होतोय ते शोधा आणि त्यावर उपाय करा.’

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाला की, ‘सर्वात प्रतिभावान आणि सर्वात नम्र कला दिग्दर्शकांपैकी एक, सर्वोत्तम कला दिग्दर्शकांपैकी एक गमावला आहे. अशी काय गोष्ट होती, ज्याने त्यांना इतकं खचल्यासारखं झालं. हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे? असं म्हणतात की, देवाला नेहमीच चांगली माणसं हवी असतात. कदाचित देवालाच त्यांची गरज होती का? मला माहीत नाही... पण त्यांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना कायम असतील.’

विभाग

पुढील बातम्या