मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suniel Shetty: सुनील शेट्टीने जावयाला दिली होती धमकी, 'कधीही...'

Suniel Shetty: सुनील शेट्टीने जावयाला दिली होती धमकी, 'कधीही...'

Aarti Vilas Borade HT Marathi

Jul 14, 2023, 12:20 PM IST

    • Suniel Shetty: सुनील शेट्टीला एका मुलाखतीमध्ये मुलीला काय सल्ला दिला होता असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या उत्तरात केएल राहुलचा उल्लेख केला आहे.
Suniel Shetty

Suniel Shetty: सुनील शेट्टीला एका मुलाखतीमध्ये मुलीला काय सल्ला दिला होता असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या उत्तरात केएल राहुलचा उल्लेख केला आहे.

    • Suniel Shetty: सुनील शेट्टीला एका मुलाखतीमध्ये मुलीला काय सल्ला दिला होता असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या उत्तरात केएल राहुलचा उल्लेख केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल नुकतेच विवाह बंधनात अडकले. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर हा लग्न सोहळा पार पडला आहे. अतिशय खाजगी अशा या सोहळ्यात केवळ मोजकेच लोक सामील झाले होते. सुनील शेट्टीने एका मुलाखतीमध्ये जावायाबाबत वक्तव्य केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

सुनील शेट्टीला एका मुलाखतीमध्ये मुलीला काय सल्ला दिला असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुनील शेट्टीने, 'जेव्हा अथियाने इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले तेव्हा मी तिला सांगितले होते यशस्वी होण्याची चिंता करु नकोस आणि अपयशी ठरली तर त्याला सामोरे जाण्यासाठी ती तयार आहे का? असा प्रश्न मी तिला विचारला होता. तसेच मी तिला सांगितले होते की पार्टनवर पूर्ण विश्वास ठेव. केएल राहूल एक अॅथलीट आहे, तो खूप प्रवास करणार, तू प्रत्येक वेळी त्याच्यासोबत प्रवास करु शकत नाही. मात्र तुझा पाठिंबा त्याला कायम असायला हवा कारण प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात' असे म्हटले.
वाचा: गुडघे टेकण्याची वेळ अद्याप आलेली नाही; शाहरुख खान असे का म्हणाला?

पुढे सुनील शेट्टीने केएल राहुलला धमकी दिल्याचे देखील सांगितले. 'मी त्याला सांगितले होते की कधीही इतका चांगला व्यक्ती बनू नकोस की लोकांना ते योग्य वाटणार नाही. तो खूप चांगला मुलगा आहे. मी अथियाला नेहमी म्हणतो की तू खूप नशीबवान आहेस' असे सुनील शेट्टी म्हणाला.

सुनील शेट्टीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो झी ५ वरील ऑप्रेशन फ्रायडेमध्ये काही दिवसांपूर्वी दिसला होता. आता लवकरच त्याचा हेरा फेरी ३ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात तो श्याम हे पात्र साकारणार आहे. चित्रपटात सुनील शेट्टीसोबत अक्षय कुमार आणि परेश रावल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

विभाग

पुढील बातम्या