मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suniel Shetty: टोमॅटोचे दर वाढताच सुनील शेट्टीने कमी केले खाणे, म्हणाला 'मी सुपरस्टार असलो तरी...'

Suniel Shetty: टोमॅटोचे दर वाढताच सुनील शेट्टीने कमी केले खाणे, म्हणाला 'मी सुपरस्टार असलो तरी...'

Aarti Vilas Borade HT Marathi

Jul 12, 2023, 05:50 PM IST

    • Tomato Price Hike : टोमॅटोच्या वाढलेल्या किंमती ऐकून सुनील शेट्टीने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Suniel Shetty

Tomato Price Hike : टोमॅटोच्या वाढलेल्या किंमती ऐकून सुनील शेट्टीने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

    • Tomato Price Hike : टोमॅटोच्या वाढलेल्या किंमती ऐकून सुनील शेट्टीने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Suniel Shetty Reaction On Tomato price hike: देशभरात टोमॅटोच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना तूर्त दिलासा मिळणार नाहीये. कारण मान्सूनमुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचं पिक खराब झालयं. परिणामी भाव १६० रुपये प्रति किलोंच्या घरात गेले आहेत. असे असताना बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीने वाढलेल्या टोमॅटोच्या किंमतीवर वक्तव्य केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

अभिनेता सुनील शेट्टी नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने टोमॅटोच्या वाढलेल्या भावावर वक्तव्य केले आहे. “माझी पत्नी एक-दोन दिवसांचा भाजीपाला घरी आणते. आम्ही जास्त करून ताज्या भाज्यांचा वापर करतो. सध्या टोमॅटोचे दर वाढत आहेत, याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावर झाला आहे. मी या दिवसात टोमॅटो खाणे कमी केले आहे. लोकांना असे वाटते की, सुपरस्टार आहेत, त्यांच्यावर महागाईचा काय परिणाम होत नाही पण असे नसते. आम्हीही या महागाईला सामोर जात असतो” असे सुनील शेट्टी म्हणाला.
वाचा: फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत?; टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवर अभिनेत्याची भन्नाट पोस्ट

पुढे तो म्हणाला, “मी एका ॲपवरून भाज्या मागवतो. यावरचे तुम्ही भाज्यांचे दर पाहिलात, तर आश्चर्याचा धक्का बसेल. इतर बाजारभावापेक्षा या ॲपवर स्वस्तात भाज्या मिळतात. आता फक्त स्वस्त मिळते म्हणून मी हे ॲप वापरत नाही तर या ॲपवर ताज्या भाज्या असतात हे महत्त्वाचे. तसेच या भाज्या कुठून आल्या आहेत, कुठल्या मातीचा वापर केला आहे, या सर्वांची माहिती या ॲपवर दिली जाते. त्यामुळे मी या ॲपवरून भाजीपाला खरेदी करतो. या ॲपमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. त्यांच्या शेतात पिकवलेला भाजीपाला थेट लोकांपर्यंत पोहोचतो.”

सुनील शेट्टीचे स्वत:चे एक हॉटेल आहे. त्यामुळे भाज्यांच्या दराविषयी त्याला माहिती असते. तो याविषयी म्हणाला, “मी एक अभिनेता असलो तरी मी एक हॉटेलवाला आहे. प्रत्येक गोष्टी खरेदी करताना मोलभाव करून घेतो. आता जर महागाईची समस्या आहे आणि टोमॅटोचे दर वाढत असतील, तर खाण्याबाबत थोडी तडजोड करावी लागेल, जी मी करत आहे. महागाईवर एक उपाय म्हणून माझ्या खंडाळ्याच्या फार्महाऊसमध्ये मी खूप साऱ्या भाजीपाल्याची झाडं लावली आहेत.”

विभाग

पुढील बातम्या